नागपुरातील तेलंगखेडी तलावावर आढळला ‘स्टॉक बिल्ड किंगफिशर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 10:31 AM2019-05-22T10:31:02+5:302019-05-22T10:31:33+5:30
तेलंगखेडी तलावावर सोमवारी सकाळी ६ वाजता स्टॉक बिल्ड किंगफिशर पक्षी आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तेलंगखेडी तलावावर सोमवारी सकाळी ६ वाजता स्टॉक बिल्ड किंगफिशर पक्षी आढळून आला. पक्षी निरीक्षकांनी याची नोंद केली आहे. हा सुंदर पक्षी उष्णकटिबंधीय प्रदेश आणि दक्षिण-पूर्व आशिया खंडात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. हा पक्षी नदी किंवा तलावाच्या काठावर राहणे पसंत करतो. हा लहान आणि सुंदर आकर्षक रंगाचा पक्षी आहे. नागपूरच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. देवराज सक्सेना आणि विद्यार्थी वैभव सिंगनजुडे, शुभम दुबे, तन्मय काळे, सौरभ ढवकर यांच्या चमूला हा स्टॉक बिल्ड किंगफिशर पक्षी तलावाच्या काठावर असलेल्या झाडावर दिसून आला. तेलंखेडी तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी पक्षी येतात. डॉ. सक्सेना यांच्यानुसार हे प्रवासी पक्षी सुद्धा अंडी द्यायला येतात.