नागपुरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 09:21 PM2018-05-25T21:21:41+5:302018-05-25T21:21:53+5:30

प्रभाग २२ मधील जलकुंभासमोरील कडबी तणाव येथील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून १०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविले. कारवाईनंतर पथक माघारी फिरताच झोपडपट्टीधारकांनी पथकावर तुफान दगडफेक केली.

Stone pelting on anti-encroachment team in Nagpur | नागपुरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक

नागपुरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक

Next
ठळक मुद्देसहायक आयुक्तांसह कर्मचारी जखमीजेसीबीच्या काचा फोडल्यामनपाच्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रभाग २२ मधील जलकुंभासमोरील कडबी तणाव येथील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून १०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविले. कारवाईनंतर पथक माघारी फिरताच झोपडपट्टीधारकांनी पथकावर तुफान दगडफेक केली. यात डोक्याला दगड लागल्याने प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्यासह तीन पोलीस कर्मचारी व जेसीबी चालक जखमी झाला. तसेच जेसीबीच्या काचाचे नुकसान झाले.
कडबी तणास पडाव येथे महापालिकेच्या मालकीची आठ एकर जागा आहे. या जागेवर अतिक्रमण करून १०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या लकडगंज झोनच्या प्रवर्तन विभागातर्फे झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानतंरही झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण न काढल्याने २ फे बु्रवारी २०१८ रोजी महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्यात आले.
अतिक्रमण हटविल्यानंतर पथक माघारी जाताना संतप्त झोपडपट्टीधारकांनी पथकावर तुफान दगडफेक केली. यात अशोक पाटील यांच्या डोक्याला दगड लागल्याने जखमी झाले. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. दगडफेकीत लकडगंज पोलीस स्टेशनचे पीएसआय गडेकर, हेड कॉन्स्टेबल नाना कोठे, माया पिल्लेवान, जेसीबी चालक अज्जू शोला आदी जखमी झाले. पथकातील अन्य कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. दगडफेकीनंतर पथक लकडगंज पोलीस स्टेशनला पोहचले. दगडफेक करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. जखमीवर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अतिक्रमण हटविण्याची कारवाई अशोक पाटील, प्रवर्तन अधीक्षक यादव जांभूळकर, नितीन मंथनवार, जमशेद अली, संजय शिंगणे, शरद इरपाते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. 

Web Title: Stone pelting on anti-encroachment team in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.