घरावर दगडफेक, कारच्या काचा फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:07 AM2021-06-23T04:07:22+5:302021-06-23T04:07:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : दाेघांनी संताजीनगर, कांद्री (ता. पारशिवनी) येथील एका घरावर दगडफेक करीत घरासमाेरील कारच्या काचा राॅडने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : दाेघांनी संताजीनगर, कांद्री (ता. पारशिवनी) येथील एका घरावर दगडफेक करीत घरासमाेरील कारच्या काचा राॅडने फाेडल्या. ही घटना साेमवारी (दि. २१) सकाळी घडली. याबाबत पाेलिसात तक्रार नाेंदविण्यात आली असून, पाेलिसांनी आराेपीस तातडीने अटक करून अवैध धंद्यांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली असून, याबाब ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव पारित केला आहे.
रमेश गाेडघाटे, रा. संताजीनगर, कांद्री हे नागपूर शहरातून प्रकाशित हाेणाऱ्या मराठी दैनिकासाठी प्रतिनिधी म्हणून काम करतात. बंटी शर्मा, रा. संताजीनगर, कांद्री व अन्य एकाने सकाळी घरासमाेर येऊन त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. या दाेघांनीही त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व त्यांच्या घरावर दगडफेक करीत दारावर धारदार वस्तूने प्रहार करीत दार ताेडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी रमेश गाेडघाडे यांच्या एमएच-४०/केआर-३२८८ क्रमांकाच्या कारवर लाेखंडी राॅडने प्रहार करीत कारच्या काचाही फाेडल्या. परिणामी, रमेश गाेडघाटे यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिस्ताे आराेपींना अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे आराेपींना तातडीने अअक करण्याची मागणी अतुल हजारे, रमेश गोडघाटे, जगन शेंद्रे, पप्पू गुप्ता, अजय रॉय, श्यामसुंदर गुप्ता, लल्ला डेहरिया, ताहीर सय्यद, रितेश गव्हाणे, बंडू मानवटकर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
...
ग्रामपंचायतचा ठराव
आराेपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती नागरिकांनी दिली. या भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लाेकांचा वावर वाढला असून, ते महिला व तरुणींना शिवीगाळ करतात, शस्त्राचा धाक दाखवितात. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार अवैध धंद्यांमुळे वाढला असल्याने या लाेकांचा बंदाेबस्त करण्यासाेबतच अवैध धंद्यांना आळा घालण्याची मागणीही नागरिकांनी केली असून, ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत ठराव पारित केला. या ठरावाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.