रोहिंग्या मुस्लिमांवरील अत्याचार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:36 AM2017-09-12T00:36:36+5:302017-09-12T00:36:51+5:30
म्यानमारच्या राखीन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध सोमवारी नागपुरात मुस्लीम समाजाच्या विविध संघटनांच्या शेकडो मुस्लीम बांधवांनी मोर्चा काढून संविधान चौकात निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : म्यानमारच्या राखीन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध सोमवारी नागपुरात मुस्लीम समाजाच्या विविध संघटनांच्या शेकडो मुस्लीम बांधवांनी मोर्चा काढून संविधान चौकात निदर्शने केली. आंदोलकांनी जोरदार नारेबाजी करून भारत सरकारला रोहिंग्या मुस्लिमांना मदत करण्याची मागणी रेटून धरली.
संविधान चौकात आॅल इंडिया मजलिस-ए-ईत्तेहादुल मुस्लिमीन नागपूर आणि मरकजी सिरतुन्नबी कमिटीच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले. प्रदर्शनापूर्वी सीए रोड, मशीद मीर फैज जवळ, मकरजी सिरतुन्नबी कमिटीच्या कार्यालयात सभा घेण्यात आली. सभेनंतर बर्मा सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलकांनी संविधान चौकापर्यंत मोर्चा काढला. संविधान चौकात आंदोलकांना मार्गदर्शन करताना मौलाना मुस्तफा म्हणाले, म्यानमारमधील दहशतवादाने सीमा गाठली आहे. एकाच समुदायाच्या नागरिकांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे भारत सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करून तेथील नागरिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करावी. मौलाना मुस्तफा रजा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कमिटीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात मरकजी सिरतुन्नबी कमिटीचे अध्यक्ष सय्यद मो. अली अशरफी, उपाध्यक्ष सय्यद परवेज रिजवी, अब्दुल लतीफ खान, उमरदराज खान, मो. कलाम, जावेद इकबाल, तारिक पटेल, वसीम खान, डॉ. ओवेश हसन, फैसल रंगूनवाला, अब्दुल रहमान, मौलाना मुस्तफा रजा, मौलाना अतीकुर्रहमान, आबिद ताजी, इरफान मुजावर, राजी अशफाक पटेल, हाजी शमीउल्लाह खान, हाजी मोहम्मद वाजीद, मो. समीर, मुश्ताक अली यांचा समावेश होता.
‘एमडीपी, जमियत’ने सोपविले निवेदन
मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी(एमडीपी)चे राष्ट्रीय अध्यक्ष अलीम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संविधान चौकात निदर्शने करून जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. जमियत उलमा-ए-हिंदचे प्रदेश उपाध्यक्ष हाफीज मसूद अहमद यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन सोपवून रोहिंग्या मुस्लिमांना मदत करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय एमआयएमचे शहर अध्यक्ष नौशाद अली हैदरी यांच्या नेतृत्वात श्याम टॉकीज चौकात मूक प्रदर्शन करण्यात आले.