ही ‘रुटीन अ‍ॅक्टिव्हिटी’ मेडिकलची रक्तपेढी बंद

By admin | Published: October 30, 2015 03:06 AM2015-10-30T03:06:31+5:302015-10-30T03:06:31+5:30

जून महिन्यात मेडिकलच्या रक्तपेढीची तपासणी करण्यात आली होती. यात आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही वेळ दिला होता ....

Stop the blood bank of 'Routine Activity' Medical | ही ‘रुटीन अ‍ॅक्टिव्हिटी’ मेडिकलची रक्तपेढी बंद

ही ‘रुटीन अ‍ॅक्टिव्हिटी’ मेडिकलची रक्तपेढी बंद

Next


नागपूर : जून महिन्यात मेडिकलच्या रक्तपेढीची तपासणी करण्यात आली होती. यात आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही वेळ दिला होता परंतु त्यानंतरही त्रुटी दूर होत नसल्याचे पाहत बुधवारी सायंकाळपासून रक्तपेढीतील कामकाज थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ रक्तपेढीचा परवाना रद्द करण्यात आला असा होत नाही. ही ‘रुटीन एक्टिव्हिटीज्’ (दैनंदिन उपक्रम) आहे. रक्ताची अपूर्ण तपासणी होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. विशेष म्हणजे, त्रुटी दूर होईपर्यंत मेडिकलमधील रक्त तपासणीचे कामकाज सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या रक्तपेढीतून करा, अशा सूचनाही दिल्या आहेत. कुठल्या रुग्णाला रक्त मिळत नसेल त्यांनी ‘एफडीए’शी संपर्क साधावा. मेडिकलच्या रक्तपेढीसोबतच एका खासगी रक्तपेढीमध्ये त्रुटी आढळल्याने कामकाज थांबविण्यात आले आहे, असे औषध प्रशासनचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी सांगितले.

Web Title: Stop the blood bank of 'Routine Activity' Medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.