खासगी रुग्णालयातील आर्थिक लूट थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:09 AM2021-04-01T04:09:45+5:302021-04-01T04:09:45+5:30
कामठी : काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने कामठी शहरातील सहा खासगी रुग्णालयात काेविड केंद्राची मान्यता दिली. या ...
कामठी : काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने कामठी शहरातील सहा खासगी रुग्णालयात काेविड केंद्राची मान्यता दिली. या केंद्रात काेराेना रुग्णांच्या नातेवाईकांकडून माेठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे अशा खासगी रुग्णालयांवर कारवाई करून आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष माेरेश्वर कापसे यांनी तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कामठीतील खासगी रुग्णालयात काेराेनाबाधित रुग्णांना भरती करतानाच लाखाे रुपये ॲडव्हान्स जमा करण्यास सांगितले जाते. रुग्ण बरा हाेईपर्यंत ८ ते १० लाख रुपये खर्च हाेताे. हा प्रकार नियमबाह्य असून, शासनाने ठरवून दिलेले दर एकाही खासगी केंद्रात लावले नाही. याउलट रुग्णाच्या उपचारासाठी दरराेज लुबाडणूक केली जात असल्याचा आराेप त्यांनी निवेदनातून केला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात भरारी पथकाद्वारे चाैकशी करून शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार रुग्णांच्या नातेवाईकांकडून बिलाची रक्कम घ्यावी, अशी मागणी माेरेश्वर कापसे यांनी केली आहे. अन्यथा सरपंच संघटनेच्या वतीने आंदाेलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.