नरखेड तालुक्यातील अवैध धंदे बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:21+5:302021-03-19T04:09:21+5:30
जलालखेडा : नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सट्टापट्टीचा गोरखधंदा सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, ...
जलालखेडा : नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सट्टापट्टीचा गोरखधंदा सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल आणि पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुतांश गावांमध्ये सट्टापट्टी सुरू आहे. याबाबत जलालखेडा पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा करण्यात आली होती. त्यावर पोलिसांनी कारवाई करीत सट्टापट्टीचा अवैध धंदे करणाऱ्या चौघांना अटक केली होती. मात्र, यानंतरही सट्टापट्टी सुरूच आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, जलालखेडा बस स्थानक परिसरात सट्टापट्टीचा अवैध धंदा सुरू आहे. येथे सट्टापट्टी लावण्यासाठी नेहमीच गर्दी जमलेली असते. यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात मनसे जिल्हा उपाध्यक्ष नरेश भोयर, नरखेड तालुका उपाध्यक्ष वसंत पाटील, सचिव साजिद पठाण, कार्तिक बंदे, हर्शल ढोरे,भावेश घोरसे यांचा समावेश होता.