रेल्वेतील खासगीकरण थांबवा : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:43 AM2020-01-09T00:43:17+5:302020-01-09T00:44:30+5:30
रेल्वेतील खासगीकरण थांबविण्यासह विविध मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने बुधवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेतील खासगीकरण थांबविण्यासह विविध मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने बुधवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले. द्वारसभेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या कर्मचारी विरोधी धोरणाबाबत जोरदार नारेबाजी करून आपला रोष व्यक्त केला.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने आयोजित द्वारसभेच्या अध्यक्षस्थानी कार्यकारिणी अध्यक्ष हबीब खान होते. आंदोलनात नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने रेल्वेतील खासगीकरण बंद करा, ग्रुप डी कर्मचाऱ्यांचे पद समाप्त करण्याचे धोरण, रेल्वेस्थानकांचे खासगीकरण, मॅन्युफॅक्चरींग युनिट, कारखान्यांचे खासगीकरण बंद करावे, जबरदस्ती निवृत्ती देणे, रेल्वेगाड्यांचे खासगीकरण, रिक्त पदांची भरती करावी आदी मागण्या करण्यात आल्या. युनियनच्या पदाधिकाºयांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी नारेबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. द्वारसभेला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सचिव एस. के. झा. विभागीय अध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य, सहायक विभागीय सचिव प्रमोद बोकडे, कोषाध्यक्ष नरेंद्र धानफुले, ई. व्ही. राव, ममता राव, लांजेवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.