सरसकट कर्जमाफीसाठी रास्ता रोको, जीआरची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:19 AM2017-08-15T01:19:09+5:302017-08-15T01:19:39+5:30
शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी सुकाणू समितीने केलेल्या आवाहनाला नागपुरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी सुकाणू समितीने केलेल्या आवाहनाला नागपुरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपूर शहरात संविधान चौक येथे धरणे व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याशिवाय शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या जी.आर.ची जाहीर होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या अटी रद्द करून शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आणि शेतकरी पुन्हा कर्जात जाऊ नये, यासाठी स्वामिनाथन कमेटीच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा शेतमालाला भाव द्यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी सुकाणू समितीने सोमवारी आंदोलनाचे आवाहन केले होते. नगपुरातील सुकाणू समितीतर्फे संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. धरणे आंदोलनानंतर रास्ता राको करण्यात आला. आंदोलनात जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, दुनेश्वर पेठे, विजयकुमार शिंदे, धर्मराज मानकर, रवींद्र तरारे, मिलिंद महादेवकर, किशोर चोपडे, रविशंकर मांडवकर, शरद खेडीकर, अरुण वनकर, गणेश भोयर, विराचे कार्याध्यक्ष अॅड. रवी संन्याल, नीरज खांदेवाले, जन संघर्ष मंचचे ए.के. घोष, बंडू मेश्राम, यशवंत चिंतले, माधव भोंडे, महराष्ट्र राज्य किसान सभा नागपूरचे शरद पिंपळे, सुधाकर वाघुके, करुणा साखरे, ललन मेश्राम, वसंत मुंडले, गंगाराम खेडकर, अखिल भारतीय किसान सभाचे अरुण लाटकर, संजय रणदिवे, चंदा मेंढे, जी.के. गोतमारे, मो. ताजुद्दीन, मधुकर भरणे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.