अवैध दारू विक्री बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:08 AM2021-01-18T04:08:28+5:302021-01-18T04:08:28+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : वेलतूर पाेलीस ठाण्यांतर्गत असलेल्या देवळी कला गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री तात्काळ बंद करण्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : वेलतूर पाेलीस ठाण्यांतर्गत असलेल्या देवळी कला गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीबाबत देवळी कला येथील रमाई महिला मंडळाच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी वेलतूरचे ठाणेदार आनंद कविराज यांना निवेदन दिले.
देवळी कला येथे अवैधरीत्या देशी दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. दारूविक्रेत्यास गावातील पाेलीस पाटलाचे सहकार्य मिळत असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. गावात सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे लहान मुले तसेच तरुण दारूच्या आहारी जात आहेत, शिवाय गावात भांडण, तंट्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे गावात शांतता भंग हाेत असून, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकाराबाबत बीट जमादार सुरपम यांच्याकडे तक्रार केली, मात्र ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आराेपही महिलांनी केला. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून दारूविक्रेत्यासह पाेलीस पाटलावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. ठाणेदारांना निवेदन देताना माजी उपसरपंच वनवास रामटेके, मधुकर कावळे, कार्तिक भाेयर यांच्यासह गावकरी उपस्थित हाेते.