राज्यातील ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:08 AM2021-03-24T04:08:18+5:302021-03-24T04:08:18+5:30

नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून देशात सुनियाेजितपणे ओबीसी नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचा आराेप राष्ट्रीय ओबीसी ...

Stop targeting OBC leaders in the state | राज्यातील ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे बंद करा

राज्यातील ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे बंद करा

Next

नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून देशात सुनियाेजितपणे ओबीसी नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचा आराेप राष्ट्रीय ओबीसी मुक्ती माेर्चाने केला आहे. एखाद्याने त्याच व्यवस्थेतील दुसऱ्यावर आराेप केला म्हणजे त्या व्यक्तीने कृती केली असे हाेत नाही. हा तर सर्व शक्तिनिशी ओबीसी नेत्याची बदनामी करण्याचे षडयंत्र असून अनिल देशमुखांचा राजीनामा सहन करणार नाही, असा इशारा संघटनेतर्फे मुख्य संयाेजक नितीन चाैधरी यांनी पत्रपरिषदेत दिला.

अख्ख्या देशात अनेक नेत्यांवर आराेप-प्रत्याराेप हाेत असतात पण कुणाचे काही बिघडत नाही. मात्र एखाद्या ओबीसी नेत्यावर आराेप झाला की सर्व तुटून पडतात. केंद्रीय संस्था एनआयए एका अधिकाऱ्याच्या प्रकरणाच्या चाैकशीत शिरते, यात बदली केलेला पाेलीस अधिकारी थेट मंत्र्यावर आराेप करताे, त्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र माध्यमात फुटते आणि विराेधक त्या मंत्र्याचा झेल घेण्यासाठी टपलेले असतात. हा सारा प्रकार मॅच फिक्सिंगसारखा असल्याचा संशय चाैधरी यांनी व्यक्त केला. हा प्रकार म्हणजे एकलव्याला अंगठा मागणारी द्राेणाचारी प्रवृत्ती असल्याची टीका त्यांनी केली. प्रशासनातील व्यक्तीने शासनातील व्यक्तीवर आराेप करायचा व मंत्र्याचा बळी घ्यायचा, हे राज्यात अराजक माजविण्याचे षडयंत्र असून अशाने राज्य कसे चालेल, असा सवाल त्यांनी केला. एकीकडे केंद्रात केंद्रीय बजेटमधून ओबीसीचे अस्तित्व संपविण्याचा प्रकार केला आहे आणि इकडे ओबीसी नेत्यांना टार्गेट केले जात असल्याची टीका त्यांनी केली. याविराेधात राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमाेर प्रदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांच्या समर्थनातही निदर्शने करणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत प्रभाकर भडके, अजित भाकरे, संजय भागे, अरुण पाटमासे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Stop targeting OBC leaders in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.