काटोल येथे विदर्भवाद्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:12 AM2021-08-27T04:12:25+5:302021-08-27T04:12:25+5:30
काटोल : वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती व लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीची मागणी व इंधन दरवाढीला विरोध दर्शवित विदर्भ ...
काटोल : वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती व लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीची मागणी व इंधन दरवाढीला विरोध दर्शवित विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गुरुवारी काटोल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले.
विदर्भातील जनतेसाठी दोनशे युनिटपर्यंतचे घरगुती वीज मोफत करा, २०० युनिटपर्यंतच्या वरील वीज दर निम्मे करा, विजेवरील अधिभार बंद करा, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद करा, शेतीपंपाचे वीज बिल माफ करा, पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर विदर्भवाद्यांनी अटक करून घेतली. यानंतर त्यांची सुटकाही करण्यात आली. विदर्भ आंदोलन समितीचे सुनील वडस्कर, वृषभ वानखेडे, धीरज मांदळे, नीलेश पेठे, संजय उपासे, महादेव नखाते, दत्ताजी धवड, दिलीप घारड, प्रभाकर वाघ, अरविंद बावीस्कर, विनीत निकोसे, हर्षद बनसोड, पुखराज रेवतकर, प्रकाश बोंद्रे, सुरेश धोटे, रमेश तिजारे, प्रवीण राऊत, मनोहर कौरती, धनराज तुमडाम, तानाजी थोटे, अमोल इंगळे, गोविंदसिंग चंदेल, विनोद गावंडे, हेमंत टावरी, रमेश दोहलिया, सार्थक धोटे, तनय धोटे, आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.