वादळ, पाऊस, पूर, विजांनी दाेन महिन्यात घेतला २७१ लाेकांचा बळी

By निशांत वानखेडे | Published: July 21, 2024 06:50 PM2024-07-21T18:50:24+5:302024-07-21T18:50:55+5:30

२४ तासात ७ जीव गेले : ३३० जनावरेही मृत्युमुखी :

Storm, rain, flood, lightning killed 271 people in the month | वादळ, पाऊस, पूर, विजांनी दाेन महिन्यात घेतला २७१ लाेकांचा बळी

वादळ, पाऊस, पूर, विजांनी दाेन महिन्यात घेतला २७१ लाेकांचा बळी

नागपूर: गेल्या दाेन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने विदर्भासह राज्यभरात थैमान घातले आहे. गेल्या २४ तासात वादळी पावसाने ७ लाेकांचे जीव गेले. विशेष म्हणजे १५ मे पासून नैसर्गिक आपत्तीने २७१ लाेकांचे बळी गेले आहेत. यात वादळ, विजा, पाऊस, पूराच्या स्थितीमुळे मृतकांची संख्या ८७ वर आहे. ४८८ लाेक जखमी झाले. या आपत्तीत ३३० जनावरेही मृत्युमुखी पडले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात दाेन महिन्यात विजा काेसळल्याने सर्वाधिक ५२ लाेक मृत्युमुखी पडले तर ५३ जखमी झाले आहेत. पुरामुळे ७ मृत्यु, भिंती किंवा इतर माेठे स्ट्रक्चर काेसळल्याने २२ मृत्युमुखी पडले, तर ५७ लाेक गंभीर जखमी झाले. झाडे काेसळल्यानेही ७ मृत्यु व १७ जखमी झाले. आपत्तीच्या इतर कारणाने १८४ लाेकांनी जीव गमावला आहे, तर ३५७ लाेक जखमी झाल्याची नाेंद आहे.

८७ पैकी छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक २० बळी, त्यानंतर पुणे १८, काेंकण १७, अमरावती १६, नागपूर विभाग १२ व नाशिक विभागात ७ लाेकांचा जीव गेला आहे.

अत्याधिक, अति व मुसळधार पावसाने सर्व जिल्हे प्रभावित
- (२०४ मि.मी. च्यावर अत्याधिक पाऊस) चंद्रपूर व गडचिराेली हे २ जिल्हे प्रभावित. मात्र २० जुलै राेजी नागपुरात ७ तासात २३२ मि.मी. पाऊस काेसळला, हेही विशेष हाेय.

- (११५ ते २०४.५ मि.मी. अति पाऊस) राज्यातील १० जिल्ह्यांचे २८ तालुके आणि त्यातील ६० मंडळ अति पावसाने प्रभावित आहेत. यात नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, पालघर, रायगड व काेल्हापूर जिल्हे आहेत.
- (११५ ते २०४.५ मि.मी. अति पाऊस) रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा व इतर १६ जिल्ह्यातील ७८ तालुके व २७४ मंडळ.

- येत्या ४८ तासात येलाे अलर्टमध्ये १८ जिल्हे, त्यातील ५८ तालुके व १५१ मंडळ प्रभावित आहेत.
- २४ जुलेपर्यंत चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा, गाेंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ येलाे अलर्ट. २३ जुलैपर्यंत रायगड, २२ जुलैपर्यंत रत्नागिरी, सिंधूदुर्ग, अमरावती ऑरेंज अलर्ट, २४ जुलैपर्यंत सातारा व अकाेला येलाे अलर्ट,

राज्यात जूनपासून सरासरी ११९ टक्के पाऊस

जिल्हा सामान्य बरसला टक्के गतवर्षी टक्के
नागपूर ३७२.५ ४५८.१ १२२.९८ ९०.७४

भंडारा            ४४८.५ ५१२.१ ११४.१८ ११२.२
गाेंदिया ४७३.२ ४६७             ९८.५४ ११०.२

चंद्रपूर            ४२५.५ ५६६.४ १३३.११ १०८.२७
गडचिराेली ५००.८ ६५७.६ १३१.३१ १२२.६४

अमरावती ३३३.६            ३००.८ ९०.१७ ७७.६४
अकाेला २८८.१ ३३१.८ ११५.१७ ७३.७२

वाशिम ३३१.४ ३७९.७ ११४.५७ ९३.२७
यवतमाळ ३३७.८            ४४२.४ १३०.९७ ९७.५७

बुलढाणा २६९.५            ३३२.६ १२३.४१ ९१.०६

Web Title: Storm, rain, flood, lightning killed 271 people in the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.