कथित प्रियकराचा रस्त्यावर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2016 03:18 AM2016-06-13T03:18:09+5:302016-06-13T03:18:09+5:30

मैत्रिणीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या एका आरोपीने तिचा भररस्त्यावर हात पकडून विनयभंग केला.

The street of the alleged lover's mess | कथित प्रियकराचा रस्त्यावर गोंधळ

कथित प्रियकराचा रस्त्यावर गोंधळ

Next

मैत्रिणीचा विनयभंग : वडील आणि भावाला मारहाण
नागपूर : मैत्रिणीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या एका आरोपीने तिचा भररस्त्यावर हात पकडून विनयभंग केला. तरुणीने (वय २०) आपल्या वडील आणि भावाला बोलवून घेतले असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास गोरक्षण जवळ ही घटना घडली.
सूरज राजेंद्र निंबाळकर (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजयनगरात राहतो. पूर्वी पीडित तरुणी त्याच भागात राहत होती. त्यामुळे तिच्याशी सूरजची मैत्री होती. सध्या ही तरुणी धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात काम करते.
संजय तिचा नेहमीच पाठलाग करून सलगी साधायचा प्रयत्न करीत होता. तिच्या लक्षात प्रकार आल्याने तिने त्याला प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे तो चिडला. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ती काम आटोपून घराकडे जात होती.
आरोपीने तिचा पाठलाग करून रहाटे चौकाजवळच्या गोरक्षण समोर तिला रोखले. तिचा हात पकडून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करू लागला. त्यामुळे मुलीने फोन करून आपल्या वडील आणि भावाला बोलवून घेतले.
आरोपीने तिला शिवीगाळ करतानाच तिचे वडील आणि भावाशी भांडण करून त्यांना मारहाण केली. यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
धंतोलीचे पोलीस पथकही पोहचले. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सूरज निंबाळकरविरुद्ध विनयभंग, मारहाण करणे, धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: The street of the alleged lover's mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.