अरे बापरे ! उपराजधानीत मोकाट कुत्र्यांचा नऊ हजार लोकांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:14 AM2018-06-19T10:14:36+5:302018-06-19T10:14:47+5:30

वाचून धक्का बसेल ! उपराजधानीत वर्षांला सरासरी ९ हजार नागरिकांना मोकाट कुत्री (श्वान) चावा घेतात.

Street dogs bites Nine thousand people in Nagpur | अरे बापरे ! उपराजधानीत मोकाट कुत्र्यांचा नऊ हजार लोकांना चावा

अरे बापरे ! उपराजधानीत मोकाट कुत्र्यांचा नऊ हजार लोकांना चावा

Next
ठळक मुद्देदिवसाकाठी २४ नागरिकांना बसतो फटका शहरात जवळपास ८० हजार श्वान

योगेंद्र शंभरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाचून धक्का बसेल ! उपराजधानीत वर्षांला सरासरी ९ हजार नागरिकांना मोकाट कुत्री (श्वान) चावा घेतात. दिवसाकाठी हे प्रमाण सरासरी २४ इतके असले तरी मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता उपराजधानीत भविष्यात मोठे संकट निर्माण होणार आहे.
मनपा सूत्रानुसार, शहरात मागील तीन-चार वर्षाच्या आकडेवारीनुसार विविध परिसरात कुत्र्यांद्वारे नागरिकांना चावण्याचे प्रमाण दरवर्षी आठ ते नऊ हजारापर्यंत आहे.
२०१७ मध्ये गणनेनुसार शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या ८० हजार नोंदविण्यात आली होती तर पाळीव कुत्र्यांची संख्या वेगळी आहे. उत्तर नागपूर, मध्य नागपुरातील मोमीनपुरा, वाडीतील दाभा, मानेवाडा-हुडकेश्वर आदी परिसरातील नागरिकांच्या मोकाट कुत्र्यांनी चावल्याच्या तक्रारी सर्वाधिक मिळताहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्यांची वाढलेली संख्या नियंत्रित करण्यासाठी आवश्यक नसबंदी अभियान २०१६ पासून संथ पडले. यानंतर व्हेटरनरी कॉलेजला नसबंदीचे काम सोपविण्यात आले. परंतु एनजीओनेही दीड महिन्यानंतर काम बंद केले.
मनपाने खूप प्रयत्न केल्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये भांडेवाडी आणि गिट्टीखदान परिसरातील अ‍ॅनिमल सेंटर सुरू करून नसबंदी करण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु गिट्टीखदान येथील शेल्टरला स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे येथील सेंटर बंद करण्यात आले. आता मनपाने स्वत: भांडेवाडीतील शेल्टर हाऊसच्या सेंटरची जबाबदारी सांभाळली आहे. परंतु या शेल्टरमध्ये जागा आणि मनुष्यबळाची कमतरता आहे. मनपाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, भांडेवाडीतील अ‍ॅनिमल्स शेल्टर होममध्ये मनपाने कॉन्ट्रॅक्टवर तीन व्हेटरनरी डॉक्टरांना नियुक्त केले आहे. तिथे जखमी आणि आजारी कुत्रांवर उपचारासह नसबंदी आॅपरेशनही केले जात आहे. सध्या सेंटरमध्ये दरविशी सहा ते सात कुत्र्यांची नसबंदी केली जात आहे. या कामला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पावसात वाढेल त्रास
पावसाच्या दिवसात पाऊस थांबताच मोकाट कुत्र्यांचे समूह रस्त्यावर बसून असतात. सर्वत्र पाणी साचून असल्याने चिखल झाल्याने वाहन चालक गाड्या सांभाळूनच चालवतात. या दिवसात कुत्र्यांची संख्याही वाढत असते. अशा वेळी वाहन चालकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

रात्रीला दुचाकी वाहनचालक होताहेत जखमी
शहरात विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावर मोकाट कुत्र् यांचे समूह राहत असल्याने दुचाकी वाहनचालकांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे. गतीने वाहन नेले तर कुत्री अंगावर धावतात. गतीने वाहन नेले तर कुत्री अंगावर धावतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. कित्येकदा कुत्रे अंगावर आल्याने घाबरून जाऊनही अपघात घडले आहेत.

Web Title: Street dogs bites Nine thousand people in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य