नागपुरातील सीताबर्डीत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ सर्वेक्षण : स्मार्ट सिटीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 09:58 PM2020-09-22T21:58:45+5:302020-09-22T21:59:54+5:30

केद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयांतर्गत ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत नागपूर स्मार्ट अ‍ॅड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सीताबर्डी बाजारपेठेत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ चे सर्वेक्षणाला सोमवारी सुरुवात केली.

Street for People survey in Sitabuldi, Nagpur: Smart City initiative | नागपुरातील सीताबर्डीत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ सर्वेक्षण : स्मार्ट सिटीचा उपक्रम

नागपुरातील सीताबर्डीत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ सर्वेक्षण : स्मार्ट सिटीचा उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देव्हेईकल फ्री झोन निवडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयांतर्गत ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत नागपूर स्मार्ट अ‍ॅड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सीताबर्डी बाजारपेठेत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ चे सर्वेक्षणाला सोमवारी सुरुवात केली.
स्ट्रीट फॉर पीपल पायलट प्रोजेक्टमध्ये निवड करण्यासाठी नागपूर शहरातील मुख्य बाजारपेठेत सात दिवस सर्वेक्षण चालणार आहे. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सीताबर्डी बाजारपेठेतून याची सुरुवात केली. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक पराग पोटे उपस्थित होते.
स्ट्रीट फॉर पीपल सर्वेक्षणादरम्यान महेश मोरोणे यांनी दुकानदारांची मते जाणून घेतली. सीताबर्डी बाजारपेठेत वाहनांचा प्रवेश प्रतिबंधित केला तर त्यांचा व्यवसायवर काय परिणाम होईल, सगळ्या प्रकारच्या वाहनांवर प्रतिबंध लावल्यास नागरिक बाजारपेठेत पायी चालू शकतील का ? नागरिकांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्य बाजारपेठेत व्हेईकल फ्री झोन केल्यामुळे हॉकर्सना देखील त्याचा फायदा होईल. चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था दुसरीकडे केली जाईल, असे ही यावेळी सांगण्यात आले.
सर्वेक्षणाला दुकानदार, हॉकर्स आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. स्ट्रीट फार पीपल केल्याने नागरिकांचा कल सीताबर्डी मार्केटकडे वाढेल आणि याचा लाभ सगळ्यांना होईल. वृध्द किंवा महिलांसाठी पायी फिरणे शक्य नसल्यास त्यांच्यासाठी ई-रिक्षाची व्यवस्था केली जाईल. तसेच युवा वर्ग या सायकलचा लाभ घेऊ शकतो. दुकानदारांना माल आणण्यासाठी रात्रीच्या वेळेत परवानगी दिली जाईल. सर्वेक्षणामध्ये एम चांडक कंपनी, खादी ग्रामोद्योग, हॉकर्स युनियनचे अध्यक्ष गोपीचंद आंभोरे आणि अन्य नागरिकांनी भाग घेतला.

सूचना व अभिप्रायावर उपाययोजना
सर्वेक्षण पुढील सात दिवस पर्यंत करण्यात येईल. याचा मुख्य उद्देश नागपूरात प्रदूषणविरहीत वाहनांना प्रोत्साहन देण्याचा आहे. नागरिकांची प्रतिक्रिया, सूचना व अभिप्राय लक्षात घेतल्यानंतर यावर पुढील उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

Web Title: Street for People survey in Sitabuldi, Nagpur: Smart City initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.