रस्त्यावरील दुकाने हटविली, जीर्ण घर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:21+5:302021-09-10T04:13:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी सदर भागातील मंगळवारी परिसर व गिट्टीखदान मार्गावर लावलेली दुकाने हटविली. ...

Street shops removed, dilapidated houses demolished | रस्त्यावरील दुकाने हटविली, जीर्ण घर पाडले

रस्त्यावरील दुकाने हटविली, जीर्ण घर पाडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी सदर भागातील मंगळवारी परिसर व गिट्टीखदान मार्गावर लावलेली दुकाने हटविली.

रस्त्यांच्या कडेला शेड उभारून मूर्ती विक्रीची दुकाने लावली होती. पथकाने ती हटविली. गोधनी बाजार रस्त्यालगतचे २५ अतिक्रमण हटविले. सतरंजीपुरा झोन पथकाने राणी दुर्गावती चौक ते कांजी हाऊस चौक मार्गाच्या दोन्ही बाजूच्या फूटपाथवर लावलेली दुकाने हटविली. भाजी विक्रेत्यांची दुकाने व हातगाड्यामुळे रहदारीला बाधा निर्माण झाली होती. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी मनपाकडे ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानुसार दुपारी १२ च्या सुमारास ३२ ठेले व इतर अतिक्रमण हटविण्यात आले.

धरमपेठ झोनच्या पथकाने सीताबर्डी, मोदी नंबर २ येथील नरसिंगदास मंत्री यांचे जीर्ण घर पाडण्यात आले. घर मालकाला झोन कार्यालयाने नोटीस बजावली होती. त्यानंतरही घर न पाडल्याने पथकाने कारवाई केली. प्रवर्तन विभागाचे उपायुक्त अशोक पाटील, निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

...

फूटपाथलाच बनविले गोदाम

रेल्वे स्टेशन मार्गावर कस्तुरचंद पार्क येथील सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलच्या संरक्षण भिंती लगत नारळ पाणी विक्रेत्यांनी फुटपाथवर अतिक्रमण केले होते. येथे नारळाचा मोठा साठा करून याचा गोदामासारखा वापर केला जात होता. ग्राहक आपली वाहने रस्त्यांवर उभी करत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार केल्याने पथकाने कारवाई केली.

Web Title: Street shops removed, dilapidated houses demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.