निवडणुकीत होणार कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन : जिल्हाधिकारी ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:09 PM2020-11-09T23:09:36+5:302020-11-09T23:12:04+5:30
Strict adherence to Corona protocol in elections कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी आरोग्य विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या प्रोटोकॉलचे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काटेकोर पालन केले जाईल, असा दावा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी करीत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक कर्मचाऱ्लाया कोरोनापासून वाचविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी आरोग्य विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या प्रोटोकॉलचे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काटेकोर पालन केले जाईल, असा दावा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी करीत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक कर्मचाऱ्लाया कोरोनापासून वाचविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेत सामील प्रत्येक विभागाच्या प्रमुखांची बैठक घेतली. यादरम्यान राज्य व केंद्र सरकारतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या गाईडलाईनची माहिती दिली. प्रत्येक विभागाच्या कामाचा आढावा घेऊन निवडणुकीचे साहित्य मतदार केंद्रापर्यंत पोहोचविणे, मतपेटी, बॅलेट पेपर, मनुष्यबळाची उपलब्धता, वाहतूक व्यवस्था, प्रशिक्षण आदींवर चर्चा करण्यात आली. पोलीस विभागाला अवैध दारू विक्री व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. १७ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या निवडणूक प्रचारावरही लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक तयारी केली जाईल.
बैठकीत पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक बसवराज तेली, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपायुक्त मिलिंद साळवे, उपनिवडणूक अधिकारी हेमा बडे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. सेलोकर उपस्थित होते.
जबाबदारी निश्चित
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नागपूर शहराची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांना देण्यात आली आहे. ग्रामीणची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. सेलोकर यांना देण्यात आली. हे दोन्ही अधिकारी निवडणुकीदरम्यान कोरोनासाठी नोडल अधिकारी म्हणून काम करतील.