गिट्टीखदान आणि मानकापुरात अट्टल गुन्हेगार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:09 AM2021-02-12T04:09:19+5:302021-02-12T04:09:19+5:30

नागपूर : गिट्टीखदान आणि मानकापुरात पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या दुचाक्यांसह दरोड्यांचे साहित्य आणि शस्त्र ...

Strict criminals arrested in Gittikhadan and Mankapur | गिट्टीखदान आणि मानकापुरात अट्टल गुन्हेगार जेरबंद

गिट्टीखदान आणि मानकापुरात अट्टल गुन्हेगार जेरबंद

googlenewsNext

नागपूर : गिट्टीखदान आणि मानकापुरात पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या दुचाक्यांसह दरोड्यांचे साहित्य आणि शस्त्र जप्त करण्यात आले.

बुधवारी पहाटे २ च्या सुमारास गणेशनगर दाभा येथील धनगाैरी नंदाजी बुवा देवस्थानामागे काही आरोपी लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे छापा घालून आरोपी चिरी ऊर्फ पंकज सदाशिव राऊतकर (रा. पलोटीनगर), रितिक मंगलसिंग राणा (रा. झिंगाबाई टाकळी), एरिल मॅक्सवेल वॉरेन (रा. सेंट मार्टिनगर, जरीपटका), अभिषेक मनोज मेश्राम तसेच करण पुरुषोत्तम नाैकरिया (दोघेही रा. झिंगबाई टाकळी) यांना अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे तसेच दरोड्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. आरोपींच्या चौकशीत ते अट्टल गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच दुचाक्या जप्त केल्या. त्या त्यांनी शहरातील विविध भागातून जप्त केल्या. अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विनीता साहू तसेच सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि गिट्टीखदानचे ठाणेदार गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता पेंडकर, हवलदार युवराज ढोले, अनिल त्रिपाठी, इमरान शेख, इशांक आटे, मंजित सिंग, राकेश यादव, संतोष शेंद्रे, आशिष बावणकर, विवेक बोटरे आणि आनंद केंद्रे यांनी ही कामगिरी बजावली.

---

पाच गुन्हे उघड

आरोपींकडे सापडलेल्या दुचाक्या त्यांनी कपिलनगर, जरीपटका, गिट्टीखदानमधून चोरल्याची कबुली दिली. उपरोक्त आरोपींवर या पोलीस ठाण्यात आधीच गुन्हे दाखल असल्याचेही उघडकीस आले आहे.

----

---

Web Title: Strict criminals arrested in Gittikhadan and Mankapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.