कठोर शिक्षेची तरतूद : शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:05 PM2018-09-11T22:05:32+5:302018-09-11T22:06:26+5:30

शेताच्या कुंपणात अवैधरीत्या वीजपुरवठा जोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात येत असून, भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याने, शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

 Strict penalties: Do not let the electricity flow in the farm fencing | कठोर शिक्षेची तरतूद : शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडू नका

कठोर शिक्षेची तरतूद : शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडू नका

Next
ठळक मुद्देवन्यप्राणी आणि मनुष्यहानीचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेताच्या कुंपणात अवैधरीत्या वीजपुरवठा जोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात येत असून, भारतीय विद्युत कायदा २००३ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याने, शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात येत असल्याने मागील काही महिन्यांत अनेक वन्यप्राणी आणि मनुष्यहानी झाली आहे. शिवाय अशाप्रकारच्या घटनांचा गैरफायदा घेत शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करून वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होत आहेत. ९ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी परिसरात शेतीच्या कुंपणात प्रवाहित विजेच्या धक्क्याने गणपत उकुंडे या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यापूर्वी १७ एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील गिरोला रिठी येथे दोन रानगवे आणि त्यांच्या दोन पिल्लांचाही शेतीच्या कुंपणात प्रवाहित विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विदर्भातील वन परिक्षेत्रालगतच्या परिसरातील शेतातील पिकाच्या रक्षणासाठी शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहित करण्यात येत असली तरी यामुळे होणारे प्राणांकित अपघात सर्वस्वी चिंतेचा विषय आहे. २३ एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतर्गत वलमाझरी जंगल शिवारात रानगव्याची शिकार याचप्रकारे करण्यात आली होती, तर २३ मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार येथे शेती कुंपणातील विजेच्या धक्क्याने रानगव्याचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांसोबतच याचा फटका सामान्य जनतेलाही बसत असून, ८ जुलै रोजी वर्धा जिल्ह्यातील बाळापूर येथे रामराव टिपले या शेतकऱ्याचा मृत्यूही शेतीकुंपणातील विजेच्या धक्क्याने झाला आहे. तर मागील वर्षी १७ आॅक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील सिंदीविहिरी येथे एका वाघिणीचाही मृत्यू अशाच प्रकारे विजेच्या धक्क्याने झाला होता. याप्रकरणात संबंधित शेतमालकाला अटक झालेली असून, ३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात तर ७ नोव्हेंबर रोजी चिमूर येथेही शेतीच्या कुंपणातील विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळले होते.

७ वर्षांची तरतूद
शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करणे म्हणजे वीजेचा अवैध वापर असून याकरिता भारतीय विद्युत कायदयात शिक्षेची तरतूद आहे, मनुष्यहानी झाल्यास सदोष मणुष्यवध किंवा मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा भारतिय दंड संहितेच्या कलम ३०४ आणि इतर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात येत असून एखाद्या वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असून यात ७ वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. सोबतच अश्या प्रकारे शेती कुंपणात वीज प्रावाहित करणाऱ्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्याचीही तरतुद असल्याने शेतकऱ्यांनी अशा प्रकारे वीजेचा अवैध वापर टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Web Title:  Strict penalties: Do not let the electricity flow in the farm fencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.