धडक कारवाईची मोहिम; नागपुरात ३९ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

By गणेश हुड | Published: December 23, 2023 04:27 PM2023-12-23T16:27:31+5:302023-12-23T16:28:04+5:30

नासुप्र व एनएमआरडीएची अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम

Strike action campaign; 39 unauthorized constructions in Nagpur | धडक कारवाईची मोहिम; नागपुरात ३९ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

धडक कारवाईची मोहिम; नागपुरात ३९ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत ले-आऊट व बांधकामाविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील पाच दिवसांत मौजा हुडकेश्वर, शंकरपूर, सालई, वेळाहरी, पेवठा, कन्हाळगाव, धामना, चिकना, सुरगाव, कळमना, वरोडा, खापरी राजा, पाचगाव व अंबाडी येथील ३९ अनधिकृत अभिन्यासातील बांधकामे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली.

नासुप्र सभापती व एनएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, सहआयुक्त अविनाश कातडे, नासुप्रच्या महाव्यवस्थापक विजया बनकर यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही कारवाई केली. सहायक अभियंता धर्मेंद्र चुटे, विवेक डफरे, अतिक्रमण समन्वय अधिकारी मनोहर पाटील, उमेश शिरपूरकर व निखिल वंजारी आदींनी ही कारवाई केली.

गृहनिर्माण संस्थेतील अनधिकृत बांधकाम तोडले
मौजा - नारी येथील खसरा क्र. १७६/१-२, विरचक्र गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अभिन्यासातील भूखंड ५२, ५३, ५५ व ५६ मधील अतिरिक्त बांधकाम तोडण्यात आले. तसेच गॅस गोडावूनच्या ऑफिसचे बांधकाम तोडण्यात आले. या भागातील गटार लाइनवरील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.....

भांडेवाडी भागातील १३ अतिक्रमणांचा सफाया

मौजा भांडेवाडी, खसरा क्र. ९१/१ येथील विजय गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या भूखंड क्रमांक ३७, ३८, ४४, ४५, ४१, ४७, ४८, ४९, ५०, ५९, ५९, ८४ व ५७ मधील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.

Web Title: Strike action campaign; 39 unauthorized constructions in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.