ओला इलेक्ट्रीक कारचालकांचा संप चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:11 PM2019-07-30T22:11:09+5:302019-07-30T22:12:13+5:30

शहरातील ओला कंपनीच्या इलेक्ट्रीक कारचालकांनी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. कंपनीच्या कस्टमर अ‍ॅपवर इलेक्ट्रीक गाड्यांचा समावेश नसल्याने गाड्यांना बुकिं ग मिळत नसून चालकांना गाड्या चालविणे परवडेनासे झाल्याचा आरोप कारचालकांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला. दरम्यान कंपनी अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

The strike of the electric driver of Ola was worsen | ओला इलेक्ट्रीक कारचालकांचा संप चिघळला

ओला इलेक्ट्रीक कारचालकांचा संप चिघळला

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शहरातील ओला कंपनीच्या इलेक्ट्रीक कारचालकांनी गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. कंपनीच्या कस्टमर अ‍ॅपवर इलेक्ट्रीक गाड्यांचा समावेश नसल्याने गाड्यांना बुकिंग मिळत नसून चालकांना गाड्या चालविणे परवडेनासे झाल्याचा आरोप कारचालकांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला. दरम्यान कंपनी अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इलेक्ट्रीक कारचालकांच्या प्रतिनिधी म्हणून एकमेव महिला कारचालक निर्मला पोर्ट यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. शहरात गेल्या अडीच वर्षापासून इलेक्ट्रीक कार सुरू आहेत. पूर्वी २५० कारचालक होते, आता केवळ ९० शिल्लक राहिल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅपवर नसल्याने कारचालकांना बुकिंग मिळत नाही. दुसरीकडे कारसाठी दररोजचे भाडे १००० रुपये व दोनदा बॅटरी चॉर्जिंगचे ७०० रुपये असे १७०० रुपये खर्च करावेच लागतात. मात्र बुकिंग मिळत नसल्याने दिवसातून कशीबशी १०००-१२०० रुपये कमाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या चारपाच महिन्यांपासून चालक प्रचंड तणावात असल्याचे त्या म्हणाल्या. इलेक्ट्रीक कार कस्टमर अ‍ॅपवर टाकून बुकिंग स्लॉट वाढविण्यात यावा, गाडीचे भाडे ५०० रुपये करण्यात यावे, आरएमटीमध्ये गाडी उभी केल्यास दंड लावू नये, गाडी मेंटेनन्सवर लक्ष द्यावे आणि चालकांना महिन्याला ४ सुट्या द्याव्या, आदी मागण्यांचे निवेदन चालकांनी कंपनी व्यवस्थापकांना सादर केले आहे. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप चालकांनी केला. पत्रपरिषदेत सत्यशील पानतावणे, प्रशांत बारसागडे, चैतन्य तायवाडे, राजेंद्र सिरसाट, राजू श्रीवास्तव, सुनील गुरव, उमेश पटले आदी उपस्थित होते.

Web Title: The strike of the electric driver of Ola was worsen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.