उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई : ८३० लिटर मोहाची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 09:33 PM2019-07-11T21:33:15+5:302019-07-11T21:34:01+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज गुरुवारी हातभट्टीची दारू विकणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई राबविली. ठिकठिकाणी छापेमारी करून ३६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज गुरुवारी हातभट्टीची दारू विकणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई राबविली. ठिकठिकाणी छापेमारी करून ३६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नागपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारु गाळली जाते. या दारूची तस्करी करून ती ठिकठिकाणी विकली जाते. बुटीबोरी, पारशिवनी, वडद आदी परिसरात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दारू गाळली आणि विकली जात असल्याची माहिती कळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी करून ८३० लिटर मोहाची (हातभट्टीची) दारू, २७९० लिटर रसायन (सडवा), १३१ लिटर देशी दारू, ७० लिटर ताडी तसेच या दारूची वाहतूक करण्यासाठी आरोपींनी वापरलेली एक दुचाकी असा एकूण व एक दुचाकी वाहन क्रमांक . एम एच ३१ ई व्ही ४४६० दुचाकी असा एकूण २ लाख ३५ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल या छाप्यात जप्त करण्यात आला. दारू गाळणारे आणि विकणारे मंगल राजू कोडापे, रोशन रामदास शेंडे, महेश लक्ष्मणराव बोबडे, विजय मनिराम कावळे, अनिल दिलीपराव मंडले, मनीष उके, संजू विशाल तागदेवे, निशिकांत ग्यांदास वासनिक, सुनील देवेंद्र मिश्रा, प्रभाकर रामचंद्र कोडापे, सुखराम पंखुलाल जांगडे, गोविंद रघुनाथ निखारे, रिंकी राजा परीहार, सोमक्का बेलंकोंडा, दिनेश गजानन डोमेवाले, भीमराव शिवराम खुले, किशोर धनराज टिपरेवार, नामदेव महादेव सुसागडे, नंदलाल भैयाराम कावळे, श्रीनिवास व्यंकट गुडलवार, विलास यादवराव सोमकुवर, निखिल सुरेंद्र खोब्रागडे, राहुल संजय भैसवारे, राजेश ज्ञानेशवर करपे, अमोल रमेश कठाणे, मंगेश सुदाम जयस्वाल, खुशाल शत्रूघ्न मेश्राम, शरद तुळशीराम मदनकर, जीवन नेसैया अकेवार, गजानन महादेव बालपांडे, गौरव खंडूजी काकडे, मनीष शिरील फ्रान्सिस आणि राणी पाल स्टडली या ३६ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिलिंद पटवर्धन, ज्ञानेश्वरी आहेर, निरीक्षक केशव चौधरी, सुभाष खरे, बाळासाहेब पाटील, सुनील सहस्रबुध्दे यांनी ही कामगिरी बजावली.