नागपुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 09:50 PM2018-10-10T21:50:31+5:302018-10-10T21:52:44+5:30

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभाग प्रमुख आणि मुंबई मुख्यालयाचे सचिव (तांत्रिक) पी.के. मिराशे यांच्या नेतृत्वाखाली ८ आॅक्टोबरला मॉ उमिया औद्योगिक वसाहत, कापसी (खुर्द) येथील प्लॉट नं. ६८ येथील महादेव पॉलिमर या कारखान्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या भरारी पथकाने धाड टाकून प्रतिबंध असलेला प्लास्टिकचा साठा जप्त केला.

Striking action of Maharashtra Pollution Control Board in Nagpur | नागपुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई 

नागपुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई 

googlenewsNext
ठळक मुद्दे ३.२५ टन प्लास्टिकचा साठा जप्त : मोहीम सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभाग प्रमुख आणि मुंबई मुख्यालयाचे सचिव (तांत्रिक) पी.के. मिराशे यांच्या नेतृत्वाखाली ८ आॅक्टोबरला मॉ उमिया औद्योगिक वसाहत, कापसी (खुर्द) येथील प्लॉट नं. ६८ येथील महादेव पॉलिमर या कारखान्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या भरारी पथकाने धाड टाकून प्रतिबंध असलेला प्लास्टिकचा साठा जप्त केला.
या कारखान्यात जवळपास १५ कामगार महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिनियमांतर्गत बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन (खर्रा पन्नी) करीत असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी प्लास्टिकचे उत्पादन जप्त करून सील करण्यात आले. जवळपास तीन लाख रुपये किमतीचा ३.२५ टन माल जप्त केला. नियमाचे पालन न केल्यामुळे या उद्योगावर दंडात्मक तसेच उद्योग बंद करण्याची कारवाईचा प्रस्ताव आहे. याच पथकाने प्रतापनगर चौकातील श्री आदर्श बाजार या किराणा सुपर शॉपीवर महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई करून बंदी असलेल्या प्लास्टिक व थर्मोकोलची जवळपास २१ किलो उत्पादने जप्त करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबईत दुकानांवर कारवाई करताना प्लास्टिक आढळलेली दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. या पुढे अवैधरीत्या प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांच्या तपासणीची धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर कारवाई पथकामध्ये किशोर पुसदकर, विनोद शुक्ला आणि संतोष मोहरे या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश होता.

Web Title: Striking action of Maharashtra Pollution Control Board in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.