धुवाँधार पावसाने उडवली दाणादाण
By Admin | Published: July 5, 2016 02:32 AM2016-07-05T02:32:30+5:302016-07-05T02:32:30+5:30
केवळ तासाभराच्या मुसळधार पावसाने सोमवारी सायंकाळी दाणादाण उडाली. शहरातील बहुसंख्य रस्ते पाण्याखाली
नागपूर : केवळ तासाभराच्या मुसळधार पावसाने सोमवारी सायंकाळी दाणादाण उडाली. शहरातील बहुसंख्य रस्ते पाण्याखाली आले होते. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यालगत गटारी तुंबल्याने रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर पाणी साचून होते. रात्री ८.३० वाजेपर्यंत ३४.६ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. -पान/२
४सायंकाळी ६ पासून एक तास जोरदार पाऊस झाला. रात्री ८.३० पर्यंत ३४.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
४एका तासाच्या पावसात शहरातील रस्ते पाण्याखाली आले. प्रमुख मार्गावर ट्रॅफिक जाम झाले होते.
४येणाऱ्या २४ तासात विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
४सराफ चेंबर, त्रिमूर्तिनगरसह बहुतांश भागात झाडे कोसळली. अग्निशमन विभाग मदतकार्यात होता.
४आनंद टॉकीज चौक, रामदासपेठ, पंचशील चौकासह अनेक भागातील गटार ओव्हरफ्लो झाले होते.
४वर्धा रोड, धरमपेठ, सुभाष रोड, कॉटन मार्केट या रस्त्यावर बराच वेळ वाहतूक जाम होती.
४दरवर्षीप्रमाणे लोहापूल, नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचले होते.
४पूर्व, उत्तर, दक्षिण नागपूरच्या आऊटर भागात पुराची स्थिती निर्माण झाली होती. पाऊस थांबल्यानंतर बऱ्याच भागात पावसाचे पाणी जमले होते.
४पावसामुळे नाल्याचा जलस्तर वाढला होता.