सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 20:00 IST2022-12-21T19:56:49+5:302022-12-21T20:00:01+5:30
येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यातील भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली.
सावित्रीबाईफुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी. आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करावा आणि कालमर्यादेत स्मारक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी. आठवडाभरात अहवाल सादर करावा, कालमर्यादेत स्मारक करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत-मुख्यमंत्री pic.twitter.com/3K0zDqTQuS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 21, 2022
नागपूर विधानभवनात आयोजित या बैठकीस इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, आमदार छगन भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय आणि मान्यवर उपस्थित होते.