धोकादायक ४४४ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:20 AM2017-12-13T00:20:03+5:302017-12-13T00:21:02+5:30
राज्यातील ब्रिटिशकालीन व सुरक्षा मुदत संपलेल्या ४४४ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले आहे. या पुलांमध्ये संरचनात्मक दोष आढळून आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
नागपूर : राज्यातील ब्रिटिशकालीन व सुरक्षा मुदत संपलेल्या ४४४ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले आहे. या पुलांमध्ये संरचनात्मक दोष आढळून आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर १३,१५१ पूल असून, त्यांची नियमित तपासणी करण्यात आली आहे. तपासणीत ज्या पुलांमध्ये दोष आढळून आला आहे अशा पुलांच्या दुरुस्तीसाठी ७९२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. उपलब्ध निधी तसेच प्राधान्यक्रम यानुसार दुरुस्तीची कार्यवाही योजनेतर रस्ते व पूल देखभाल-दुरुस्ती अनुदानातून केली जाणार आहे. पूर पातळी धोक्याच्या पातळीवर गेल्यास नियंत्रण कक्षामध्ये सूचना मिळण्यासाठी पूर पातळी निदर्शक इलेक्ट्रॉनिक सेन्सर बसविण्यात आले आहे.