‘एलबीटी’विरुद्ध संघर्ष सुरूच राहणार
By admin | Published: July 28, 2014 01:31 AM2014-07-28T01:31:58+5:302014-07-28T01:31:58+5:30
भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आणि व्यापाऱ्यांना जेरीस आणणाऱ्या राज्य शासनाच्या एलबीटीविरुद्ध संघर्ष पुढेही सुरूच राहील, असा विश्वास नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमसर्च नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर
नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर पंचमतिया यांची माहिती : लेडिज विंग लवकरच
नागपूर : भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आणि व्यापाऱ्यांना जेरीस आणणाऱ्या राज्य शासनाच्या एलबीटीविरुद्ध संघर्ष पुढेही सुरूच राहील, असा विश्वास नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमसर्च नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर पंचमतिया यांनी येथे व्यक्त केला. चेंबरची लेडिज विंगची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चेंबरची वार्षिक सभा आणि २०१४-१५ करिता निवडणूक सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात रविवारी पार पडली. यावेळी चेंबरचे मावळते अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी सांगितले की, दोन वर्षात चेंबरने अनेक मुद्दे उचलून धरले.
एलबीटीविरुद्धची लढाई एकत्रितरीत्या लढली. महाराष्ट्राच्या सीमेवरील एमव्हॅटचा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडून रद्द करविला. व्हॅटवर अधिभार लावून एलबीटीचा प्रश्न सुटणार नाही, शिवाय मनपाच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्नावर तोडगा काढला नाही, पण, असे काहीही नाही, मुख्यमंत्री चुकीची माहिती देत असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला.केंद्राच्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील जाचक तरतूदी दूर करण्याची मागणी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे लावून धरली. यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष नीलेश सूचक, रजनीकांत गरीबा, अजय मदान उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एनव्हीसीसीची नवनियुक्त कार्यकारिणी
२०१४-१५ या वर्षांसाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्षपदी मयूर पंचमतिया, उपाध्यक्ष प्रकाश मेहाडिया, अजय मदान, हेमंत गांधी, सचिव मनूभाई सोनी, कोषाध्यक्ष राजू व्यास, सहसचिव सचिन पुनियानी, अशोक संघवी व अर्जुनदास आहुजा तर विशेष आमंत्रित म्हणून चुन्नीभाई शाह यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये अभिषेक झा, भरतकुमार ठक्कर, फारूखभाई अकबानी, गजानंद गुप्ता, गोविंद मंत्री, जयप्रकाश पारेख, मनोज लचुरिया, नटवर पटेल, प्रभाकर देशमुख, प्रताप मोटवानी, राजू माखिजा, राजेश ओहरी, राम अवतार तोतला, रामदास वजानी, राज शाह, राजेश ठक्कर, रामराज नदार, संतोष काबरा, संजयराज मोढ सराफ, शब्बीर शकीर, सतीश बंग, संजय अग्रवाल, सूर्यकांत अग्रवाल, उमेश पटेल, विजय केवलरमानी यांचा समावेश आहे. को-आॅप सदस्यांमध्ये वीरेन चांडक, अजय पाटणी, धीरज मालू, हस्तीमल कटारिया तसेच सर्व ट्रेड युनियनचा एक प्रतिनिधी एक सदस्य राहील. निवडणूक अधिकारी वीरेन चांडक यांना नारायण तोष्णीवाल, निखील कुसुमगर, मोहन गट्टानी, संजय अग्रवाल यांनी मदत केली.