एसटीचा संप चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 01:29 AM2017-10-19T01:29:21+5:302017-10-19T01:29:35+5:30

एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

 Stuck in ST | एसटीचा संप चिघळला

एसटीचा संप चिघळला

Next
ठळक मुद्देकर्मचाºयांनी केली दोन खासगी बसेसची तोडफोड : विभागाला ७० लाखाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. संपाच्या दुसरा दिवस अखेर नागपूर विभागाला तब्बल ७० लाखाचा फटका बसला.
एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे गणेशपेठ बसस्थानकावर दिवसभर शांतता होती. कर्मचाºयांनी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच बस आडव्या लावल्या होत्या. आगारात उभ्या असलेल्या बसेसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. संपाबाबत पुढे काय होणार याबाबत कर्मचारी चर्चा करताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे दिवाळीत प्रवाशांच्या सुविधेसाठी हंसा ट्रॅव्हल्सतर्फे ७०-८० बसेस विविध मार्गावर चालविण्यात येत आहेत.
यातील एम. एच. ३१, एफ. सी. ०३८२ ही बस रामटेकवरून येत असताना एसटी कर्मचाºयांनी या बसला मनसर टोल नाक्याजवळ थांबवून बसच्या टायरमधील हवा सोडली. त्यामुळे मार्गातील वाहतूक विस्कळीत झाली. तर बस क्रमांक एम. एच. ३१, सी. ए. ६२४४ मनसर-आमडीफाटाजवळ थांबवून त्याची विंडशिल्ड तोडुन एअर प्रेशर लिक केले. या दोन्ही प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या हितासाठी चालवित आहोत बसेस
हंसा ट्रॅव्हल्सचे संचालक दिलीप छाजेड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे निर्देश आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर हंसा ट्रॅव्हल्सच्या ७० ते ८० बसेस प्रवाशांसाठी चालविण्यात येत आहेत.
या बसेसमध्ये एसटी महामंडळाचे दरपत्रकही लावण्यात आले आहे. प्रवाशांच्या हितासाठी करण्यात येणाºया या सेवेच्या विरोधात संप करणाºया एसटी कर्मचाºयांनी पाऊल उचलून बसेसची हवा सोडली. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांची सुरक्षा पुरविण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवाशांची गैरसोय
एसटी कर्मचाºयांच्या संपाच्या दुसºया दिवशी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एसटीच्या बसेस बंद असल्यामुळे अनेकांनी आपला प्रवासाचा बेत रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर अनेक प्रवाशांनी खासगी बसेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यात खासगी बसेसकडूनही अधिक शुल्क आकारण्यात आल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली. खासगी बसेस ग्रामीण भागात जात नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना संपाचा अधिक फटका बसला.

Web Title:  Stuck in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.