जीवन-मृत्यूच्या संघर्षात अडकलीय नेहा; प्रत्यारोपणासाठी हवेत तब्बल ५५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:39 AM2018-01-11T00:39:46+5:302018-01-11T00:40:02+5:30

नेहा साळुंके. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वप्नाळू मुलगी. बी-कॉमनंतर उच्च ध्येय गाठायच्या उद्देशाने मोठ्या आत्मविश्वासासह पुढे निघाली खरी, पण शरीराने दगा दिला. हृदय आणि फुप्फुस निकामी झाले.

Stuck in the struggle for life and death; 55 lakhs in the air for transplant | जीवन-मृत्यूच्या संघर्षात अडकलीय नेहा; प्रत्यारोपणासाठी हवेत तब्बल ५५ लाख

जीवन-मृत्यूच्या संघर्षात अडकलीय नेहा; प्रत्यारोपणासाठी हवेत तब्बल ५५ लाख

Next

नागपूर : नेहा साळुंके. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वप्नाळू मुलगी. बी-कॉमनंतर उच्च ध्येय गाठायच्या उद्देशाने मोठ्या आत्मविश्वासासह पुढे निघाली खरी, पण शरीराने दगा दिला. हृदय आणि फुप्फुस निकामी झाले. परिणामी, नेहा पल्मोनरी हायपर टेन्शन या आजाराच्या विळख्यात सापडलीय. डॉक्टर म्हणतात, प्रत्यारोपण हाच अखेरचा पर्याय, पण त्यासाठी तब्बल ५५ लाखांचा खर्च समोर आव्हान बनून उभा ठाकलाय. मोठे ध्येय बाळगणारी स्वप्नाळू नेहा जीवन-मृत्यूच्या संघर्षात अडकलीय. एवढी प्रचंड रक्कम खर्च करणे नेहाच्या कुटुंबीयांसाठी अशक्य गोष्ट आहे. एक पर्याय आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सढळ हाताने मदत केली, तर नेहा व तिच्या स्वप्नांनाही जीवनदान मिळू शकते.
पुण्यात राहणारी नेहा अतिशय पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड ठेवणारी मुलगी. तिला जडलेल्या या जीवघेण्या आजारामुळे तिचे कुटुंब पुरते कोलमडलेच होते. मात्र, नेहानेच तिच्या सकारात्मक विचारातून कुटुंबालाच धीर दिला आहे. हृदय आणि फुप्फुस निकामी झाल्याचे माहीत असूनही जगण्याची तिची ऊर्मी कुटुंबाला बळ देत आहे. नेहा बीकॉम झाली, तेव्हा सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून होती. नेहाचे वडील सुरेश साळुंखे पुण्यात लेबर विभागात कर्मचारी आहेत. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. काटकसर करीत करावा लागणारा संघर्ष या कुटुंबाच्याही वाट्याला आला आहे.
दीड वर्षांपूर्वी वर्गात असताना अचानक नेहाचा श्वास भरून आला. तपासणी केली, तेव्हा हृदयात पाणी जमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. औषधोपचार करण्यात आले. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वातावरणात बदल झाला, तसा नेहाला परत तोच त्रास सुरू झाला. पुन्हा तपासणी केली, तेव्हा तिचे हृदय काम करण्याच्या स्थितीतच राहिले नसल्याचे व फुप्फुसही शरीराची साथ सोडत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अशातच चेन्नई येथे प्रत्यारोपण करून याच आजारातून सुखरूप बाहेर आलेल्या साताºयाची कोमल या मुलीबाबत माहिती मिळाली.
नेहाने प्रत्यक्ष या मुलीसोबत संपर्क साधल्यानंतर साळुंके कुटुंबाला आशेचा किरण मिळाला. नेहाला चेन्नईच्या ग्लेनेगल ग्लोबल सिटी या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी १२ तासांचे आॅपरेशन होईल व त्यानंतर २१ दिवस आयसीयू व पुन्हा दोन महिने रुग्णालयातच राहावे लागणार आहे. नेहाच्या उपचारासाठी तिचे आई आणि वडील चेन्नई येथे भाड्याने खोली करून राहात आहेत.
सध्या प्रत्यारोपणासाठी मॅच होणारे हृदय आणि लंग्सची शोधाशोध केली जात आहे. प्रत्यक्ष आॅपरेशन झाल्यानंतर आणखी तीन महिने तेथेच काढावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलमध्ये उपचार आणि महागड्या चाचण्यांमध्ये ६ लाख रुपये खर्च झाले आहेत. संपूर्ण खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी वडील सुरेश साळुंके यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम गोळा करणे या मध्यमवर्गीय बापालाही कठीण जात आहे. त्यामुळे नेहाला वाचविण्यासाठी मदतीची नितांत गरज आहे.
समाजातील संवेदनशील दानदात्यांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करण्याची हाक कुटुंबाने दिली आहे. नेहाला वाचविण्यासाठी ज्या दानदात्यांना मदत करायची असेल, त्यांनी नेहा सुरेश साळुंके यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या ०३२१०१०१००२२ या खात्यावर मदत राशी जमा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. बँकेचा आयएफएससी कोड- आयसीआयसी ००००३२१ (आयसीआयसी बँक, चिंचवड) असा आहे.

Web Title: Stuck in the struggle for life and death; 55 lakhs in the air for transplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.