नागपूरच्या पिवळी नदीत विद्यार्थी वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:01 AM2018-08-22T00:01:59+5:302018-08-22T00:02:52+5:30

वाहत येत असलेला बॉल काढण्याच्या नादात शाळकरी मुलगा पिवळी नदीच्या पाण्यात वाहून गेला. अदनान शेख शकील कुरेशी (वय ८ वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. तो म. गांधी विद्यालयात तिसरीचा विद्यार्थी होता. वनदेवीनगरात मंगळवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली.

Student drawn away in the Piwali Nadi at Nagpur | नागपूरच्या पिवळी नदीत विद्यार्थी वाहून गेला

नागपूरच्या पिवळी नदीत विद्यार्थी वाहून गेला

googlenewsNext
ठळक मुद्देवनदेवीनगरात घटना : परिसरात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहत येत असलेला बॉल काढण्याच्या नादात शाळकरी मुलगा पिवळी नदीच्या पाण्यात वाहून गेला. अदनान शेख शकील कुरेशी (वय ८ वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. तो म. गांधी विद्यालयात तिसरीचा विद्यार्थी होता. वनदेवीनगरात मंगळवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली.
दोन दिवसांपासून शहरात संततधार पाणी सुरू असल्यामुळे नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. पिवळी नदीलाही पूर आला आहे. पिवळी नदीच्या काठावर राहणाऱ्या गरीब परिवारातील मुले पाण्यात वाहून येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू काढण्याच्या नादात काठावर उभे होते.
दुपारी १२ च्या सुमारास अदनान त्याच्या साथीदारांसह वनदेवीनगरातील नदीजवळ खेळत होता. त्याला पाण्यात प्लास्टिकचा बॉल वाहत येत असल्याचे दिसले. तो काढण्याच्या नादात तो काठावर गेला. चिखलामुळे पाय घसरल्याने अदनान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ते पाहून त्याच्यासोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली. ती ऐकून शेजारचे लोक धावले. मात्र, वेगवान प्रवाहामुळे अदनान वाहून गेला. या घटनेची माहिती कळताच यशोधरानगर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कळमना परिसरापर्यंत शोधाशोध केली, मात्र अदनान सापडला नाही.
अदनानचा परिवार गरीब आहे. त्याला आई मर्जिना कुरेशी, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. मर्जिना मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा रेटतात. या घटनेमुळे अदनानच्या परिवाराला जबर मानसिक धक्का बसला आहे. परिसरातही शोककळा पसरली आहे. अदनानच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Student drawn away in the Piwali Nadi at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.