नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर भागात विद्यार्थ्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:44 AM2018-07-11T00:44:11+5:302018-07-11T00:46:33+5:30
मित्रांसोबत पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्याला पोहता येत नसतानाही सप्तधारा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुरखेडा (बोरगाव) शिवारात मंगळवारी दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्रांसोबत पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्याला पोहता येत नसतानाही सप्तधारा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुरखेडा (बोरगाव) शिवारात मंगळवारी दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान घडली.
साहिल मनोहर भोयर (१७, रा. जरीपटका, नागपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. साहिल महात्मा गांधी सेन्टेनियल सिंधू हायस्कूल, जरीपटका, नागपूरचा इयत्ता १२ वीचा विद्यार्थी होता. तो मंगळवारी दुपारी धुरखेडा (बोरगाव) शिवारातील सप्तधारा नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ मित्रांसोबत मोटरसायकलने पिकनिकला आला होता. पोहण्याचा मोह न आवरल्याने तो बंधाºयात पोहण्यासाठी उतरला आणि खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. त्यामुळे मित्रांनी आरडाओरड केली. त्यातच पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, तो पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याला लगेच बाहेर काढून कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. तो एकुलताएक असून, त्याला पोहता येत नसल्याचे मित्रांनी सांगितले. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.