विद्यार्थ्याचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 12:27 AM2021-06-01T00:27:46+5:302021-06-01T00:28:43+5:30
Student drowns death पोहता येत नसतानादेखील खोल पाण्यात उतरल्यामुळे एका बारावीच्या विद्यार्थ्याचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी चारच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिटेसूर खदानीत ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोहता येत नसतानादेखील खोल पाण्यात उतरल्यामुळे एका बारावीच्या विद्यार्थ्याचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी चारच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिटेसूर खदानीत ही घटना घडली. रोहित फुलचंद भिसेन (वय १८) असे मृताचे नाव आहे. तो कोराडी नाका परिसरात राहत होता.
बारावीचा विद्यार्थी असलेला रोहित भिसेन रविवारी दुपारी त्याच्या काही मित्रांसोबत पिटेसूर खदानीकडे फिरायला गेला होता. खदानीच्या पाण्यात मित्र पोहोत असल्याचे पाहून तो सुद्धा खोल पाण्यात गेला आणि बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत वेळ झाली होती. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर मित्रांनी आरडाओरड करून आजूबाजूच्यांना माहिती दिली. नंतर गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी पोहोचले. फुलचंद रामलालजी भिसेन (वय ४०) यांनी दिलेल्या माहितीवरून गिट्टीखदानचे पोलीस उपनिरीक्षक वाकलेकर यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.