चॅटिंग करणे बंद केले म्हणून विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:02+5:302021-04-09T04:09:02+5:30
नागपूर - चॅटिंग करणे बंद केले म्हणून एका आरोपीने विद्यार्थिनीची इन्स्टाग्रामवर फेक आयडी तयार करून तिचा विनयभंग केला. पीडित ...
नागपूर - चॅटिंग करणे बंद केले म्हणून एका आरोपीने विद्यार्थिनीची इन्स्टाग्रामवर फेक आयडी तयार करून तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने याप्रकरणी कपिलनगर ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आदित्य राठोड असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी १६ वर्षांची असून, ती कपिलनगरात राहते. ३ मार्चला तिची इन्स्टाग्रामवर आदित्य राठोडसोबत ओळख झाली. त्यानंतर ते चॅटिंग करू लागले. काही दिवसातच तो लज्जास्पद भाषेचा वापर करू लागल्याने, मुलीने त्याच्यासोबत चॅटिंग करणे बंद केले. त्यामुळे आरोपी राठोड चिडला. त्याने पीडित मुलीच्या बहिणीच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून त्याद्वारे अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली आणि नंतर अत्यंत घाणेरड्या भाषेचा वापर करून मुलीची बदनामी करू लागला. हा प्रकार एका मैत्रिणीने लक्षात आणून दिल्यानंतर पीडित मुलीने बुधवारी कपिलनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपी राठोडचा शोध घेतला जात आहे.
----