विद्यार्थी खिचडीच खात नाही! -तर विषबाधा होणार नाही का ?:
By admin | Published: February 28, 2016 03:02 AM2016-02-28T03:02:08+5:302016-02-28T03:02:08+5:30
विद्यार्थ्यांना सकस शालेय पोषण आहार मिळावा यासाठी केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते.
कलोडे विद्यालयातील वास्तव
नागपूर : विद्यार्थ्यांना सकस शालेय पोषण आहार मिळावा यासाठी केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र नागपुरातील कलोडे विद्यालयातील विद्यार्थी जेवणाचे डबे आणत असल्याने शासनाने विहित केलेल्या नियमानुसार खिचडी शिजवल्यास खिचडी संपत नाही व ती वाया जाते. त्यामुळे शाळेत कमी प्रमाणात खिचडी शिजवली जाते. त्यामुळे तांदूळ शिल्लक राहतो, असे पत्र कलोडे विद्यालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आहे.
कलोडे विद्यालयाच्या या पत्रात वास्तव आहे असे मानले तर शालेय पोषण आहाराची योजना यंदापासून सुरू झाली का, असा प्रश्न या निमित्ताने पडतो. विद्यार्थी जेवणाचे डबे आणत असल्याने तांदूळ शिल्लक राहत असेल तर याबाबत शिक्षण विभागाला कधी मुख्याध्यापिकेने कळविले का ? पटसंख्येच्या आधारावर विद्यालयाने मग आजवर तांदूळ का घेतला ? सरकारकडून शालेय पोषण आहाराचे अनुदान कमी का करून घेतले नाही, असे प्रश्न शाळेची बाजू वाचल्यावर निश्चितच पडतात. याबाबत मात्र शिक्षण विभागाची पाटी अद्यापही कोरीच आहे. मात्र शिक्षण उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर विद्यार्थी जेवणाचे डबे आणतात त्यामुळे तांदूळ शिल्लक राहतो, असे पत्र देण्याचे विद्यालय प्रशानाला निश्चितच कळलेले दिसते.