कॅथलिक असोसिएशनतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:08 AM2021-02-07T04:08:30+5:302021-02-07T04:08:30+5:30
नागपूर : ऑल इंडिया कॅथलिकशी निगडित कॅथलिक असोसिएशन ऑफ नागपूरच्या वतीने कॅथलिक गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात पीएचडी, ...
नागपूर : ऑल इंडिया कॅथलिकशी निगडित कॅथलिक असोसिएशन ऑफ नागपूरच्या वतीने कॅथलिक गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात पीएचडी, डिग्री, डिप्लोमा, बीएससी नर्सिंग, एसएससी व एचएससी विद्यार्थ्यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी एन्थनी डिसूजा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हिस ग्रेस मोस्ट रेव, डॉ. एलियास गोंसाल्वेस उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रिंसी मॉरिस, डॉ. मनोहर कुमार, डॉ. एडगर मॅकेंजी, डॉ. स्टेनली ग्रेगरी, डॉ. शिबिका फ्रान्सिस, फैबिना लियोनार्ड, नील सायमन, अमित फर्नांडिज, शेओना थॉमस, सिल्वेस्टर क्लार्क, सोनाली फ्रान्स्वा, फ्लोरिन फर्नांडिज, एण्ड्रिया साल्वे, मेल्विन काकडे, सेल्विन फ्लोरियन, क्लेटन फर्नांडिज, एण्ड्रिया जोसेफ, स्टिवन टाईट्स, जेसिका डेविड, जोस थॉमस, विजय फर्नांडिज, डॉ. अरुण जोसेफ उपस्थित होते.
चिटणविसपुरा येथे हळदी-कुंकू ()
नागपूर : राणी लक्ष्मीबाई माँ विकास मंडळाच्या वतीने शिवाजीनगर, चिटणविसपुरा येथे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष माया भोस्कर, ममता सावरकर, पुष्पा काळबांडे, नीता धायणे, अरुण पगारे, लक्ष्मी कुंभार, सारिका फटिंग, जया भगते, दुलारा बाई उपस्थित होत्या. कार्यक्रमात महिलांना हळदी-कुंकवासह वाण, भेटवस्तू व तिळगुळाचे वाटप करण्यात आले.
सेन्ट पॉल स्कूलमध्ये एनसीसी बोर्ड ()
नागपूर : हुडकेश्वर येथील सेन्ट पॉल स्कूलमध्ये गणराज्य दिनाच्या निमित्ताने एनसीसी बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कोरोना काळात सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मीनाक्षी पटले यांनी एनसीसी इंचार्ज म्हणून जबाबदारी स्वीकारली. प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्य देवांगणा पुंडे, उपप्राचार्य संगीता फिरके, क्रीडा प्रमुख अविनाश बारसे उपस्थित होते. यावेळी दहावी व १२वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या ३२५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
ऑटोचालक महासंघातर्फे जनजागृती ()
नागपूर : चाईल्ड लाईन व नागपूर जिल्हा ऑटो चालक मालक महासंघाच्या वतीने व्हेरायटी चौक येथे चाईल्ड लाईनतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रत्येक ऑटोवर स्टिकर्स लावण्यात आले. यावेळी महासंघाच्यावतीने नागरिकांना निराधार व पीडित मुलांच्या व्यथेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मोहन बावणे, अरविंद पवार, संजय जिचकार, खोरेंद्र सोनिक, देवेंद्र बेले, चंदू मारुडा, अर्चना पाटील उपस्थित होते.