‘पेट’साठी विद्यार्थ्यांच्या उड्या

By admin | Published: September 10, 2015 03:43 AM2015-09-10T03:43:38+5:302015-09-10T03:43:38+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘पेट’साठी (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे.

Students leap for 'stomach' | ‘पेट’साठी विद्यार्थ्यांच्या उड्या

‘पेट’साठी विद्यार्थ्यांच्या उड्या

Next

नागपूर विद्यापीठ : दोन दिवसांत सुमारे १५०० अर्ज दाखल
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘पेट’साठी (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. यंदा ‘पेट’ला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून सुरुवातीच्या दोन दिवसातच सुमारे १५०० अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षीपासून ‘पेट’ परीक्षा ही विषयनिहाय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी यंदा ‘पेट’साठी अर्ज भरण्यास प्राधान्य दिले आहे.
नागपूर विद्यापीठात दरवर्षी ‘पेट’ या ‘आॅनलाईन’ परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यंदापासून प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठीसोबतच हिंदी भाषेतदेखील राहणार आहे.त्यामुळे हिंदी भाषिक विद्यार्थ्यांसमोरील मोठी अडचण दूर झाली आहे. शिवाय यंदापासून ‘पेट’च्या शुल्कासाठी बँकेचे चालान भरणे, डीडी काढणे अशी लांबलचक प्रक्रियेपासून विद्यार्थ्यांची सुटका झाली आहे. केवळ एका ‘क्लिक’वर विद्यार्थ्यांना शुल्क भरता येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘पेट’चे स्वरूप पुढील वर्षीपासून बदलण्यात येणार आहे. नव्या स्वरूपात दोन पेपर राहणार असून, यात विषयाशी संबंधित प्रश्नपत्रिकेचा समावेश राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होणे हे विद्यार्थ्यांसाठी सोपे राहणार नसल्याचे स्पष्ट आहे.
या सर्व बाबी लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांचा यंदा ‘पेट’ देण्याकडे ओढा असून पहिल्या दिवशीपासूनच ‘आॅनलाईन’ अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दोन दिवसांतच सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे यंदा अर्जांचा ‘रेकॉर्ड’ होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. ‘पेट’ची ‘आॅनलाईन’ परीक्षा ९ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत होणार असून निकाल १६ आॅक्टोबर रोजी संकेतस्थळावर मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Students leap for 'stomach'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.