नागपुरातील विद्यार्थ्यांनी साकारला शिवरायांचा सागरी अलंकार सिंधूदुर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:56 AM2018-10-31T10:56:33+5:302018-10-31T10:57:01+5:30
नागपुरातील सेवासदन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिंधूदुर्गची प्रतिकृती शाळेत साकारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दिवाळी आणि मातीच्या किल्ल्यांचे अतूट नाते आहे. दिवाळीच्या आधी किल्ले बांधणीची आखणी केली जाते. माती जमवणे, तिला भिजत ठेवणे, किल्ल्याची रचना असे अनेक गड बालगोपालांना या काळात सर करायचे असतात. या निमित्ताने त्यांना त्यांच्यातले मावळेपण वा राजेपण अनुभवता येत असते. ही परंपरा राखत नागपुरातील सेवासदन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिंधूदुर्गची प्रतिकृती शाळेत साकारली आहे.
भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्ग निर्मितीचे महत्त्व ओळखून शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सागरी आरमाराचा भक्कम आधार म्हणजे सिंधूदुर्ग.
या विद्यार्थ्यांनी मोठ्या कल्पकतेने व परिश्रमातून ती साकारली आहे.