हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरुंना हटवा; विद्यार्थ्यांची नितीन गडकरींना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 11:36 AM2023-08-14T11:36:53+5:302023-08-14T11:41:54+5:30
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय एका वेगळ्याच कारणाने चांगलेच गाजत आहे.
नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्यांच्या पदावरून हटविण्यात यावी, अशी विनंतीवजा मागणी येथील विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरुंविरोधात सातत्याने महिलांवरील अत्याचारांचे आरोप होत आहेत. त्यामुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी विद्यार्थी काही शिक्षकांनी केली. परंतु कुलगुरुंनी मागणी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांनाच निलंबित केले. त्यामुळे अशा कुलगुरुंना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
इन्कलाब विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दिनेश सिंह राजपुरोहित, जतीन चौधरी आणि आदित्य स्वराज या विद्यार्थ्यांनी रविवारी गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात यासंदर्भातील निवेदन सादर केले. यासोबतच मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे.