नितीन गडकरींच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे 'शाळा आंदोलन', रस्त्यावरच भरवली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 01:00 PM2022-01-03T13:00:41+5:302022-01-03T13:13:41+5:30

फासेपारधी समाजातील हे विद्यार्थी असून समृद्धी महामार्गामध्ये आश्रमशाळेची उद्धवस्त झालेली इमारत, वाचनालय आदींची शासनाकडून पुन्हा नव्याने उभारणी करून द्यावी, अशी मुख्य मागणी या विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे केली आहे.

students 'School agitation' outside in Nitin Gadkari's house | नितीन गडकरींच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे 'शाळा आंदोलन', रस्त्यावरच भरवली शाळा

नितीन गडकरींच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे 'शाळा आंदोलन', रस्त्यावरच भरवली शाळा

googlenewsNext

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरासमोर आज सोमवारी विद्यार्थ्यांनी चक्क आंदोलन (Agitation) करत रस्त्यावरच शाळा भरवली. हे विद्यार्थी फासेपारधी समाजातील असून आज सकाळपासूनच ते आंदोलनाला बसले आहेत. 

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेतील हे विद्यार्थी आहेत. त्यांच्या आश्रमशाळेची जागा समृद्धी महामार्गात गेल्यामुळे आज गडकरींच्या घरासमोरच रस्त्यावरच शाळा भरवत हे अनोखं आंदोलन केलं आहे.

समृद्धी महामार्गामध्ये प्रश्नचिन्ह आश्रमशाळेची जमीन, शाळेला बारा महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर, वाचनालय, खेळाचे मैदान, मुलींचे प्रसाधन गृह इत्यादी गेले असून  शासनाकडून याची नव्याने उभारणी करून देण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. 

या आश्रमशाळेत १ली ते १० वी पर्यंतचे इयत्ता असून फासेपारधी समाजाचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. समृद्धी महामार्गात त्यांच्या आश्रमशाळेची जागा गेली, इमारत उध्वस्त झाली शासनाकडून याची नव्याने उभारणी करून द्यावी, या मागण्या मान्य व्हाव्यात याकरता आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी गडकरींच्या घरासमोर आंदोलन करत रस्त्यावरच शाळा भरवली. 

आंदोलन सुरू असताना नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि ते गोव्याकडे रवाना झाले. विद्यार्थ्यांच्या मागण्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिल्याची माहिती आहे.

Web Title: students 'School agitation' outside in Nitin Gadkari's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.