शालेय शिष्यवृत्तीकडे विद्यार्थ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 09:22 PM2018-03-31T21:22:40+5:302018-03-31T21:22:54+5:30
शालेय जीवनातील शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करणे, ही त्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची पावती मानल्या जाते. या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळणे हे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देणारे ठरते. मात्र अनेक वर्षांपासून या शिष्यवृत्तीच्या रकमेत शासनाने वाढच केली नाही. त्यामुळे तुटपुंज्या शिष्यवृत्तीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अर्ध्यावर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शालेय जीवनातील शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करणे, ही त्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची पावती मानल्या जाते. या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळणे हे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देणारे ठरते. मात्र अनेक वर्षांपासून या शिष्यवृत्तीच्या रकमेत शासनाने वाढच केली नाही. त्यामुळे तुटपुंज्या शिष्यवृत्तीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अर्ध्यावर आली आहे.
शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबविले आहेत. त्यावर करोडो रुपये खर्च केले आहे. शिक्षण विभागापासून शाळास्तरावरील मोठे मनुष्यबळ या कामी लावले आहे तरी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा लवलेश दिसून येत आहे. परंतु जेथून खरोखरच गुणवंत विद्यार्थी घडतात किंवा त्यासाठी प्रोत्साहन दिले जाते अशा योजनेवर शासन एक रुपयाही वाढ करीत नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासनातर्फे राबविण्यात येणाºया शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात ही अवस्था दिसून येत आहे. पूर्वी शासनातर्फे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती. पालकवर्ग जागृतपणे मोठ्या प्रमाणावर पाल्यांना या परीक्षेला बसवीत होते. परंतु अलीकडच्या काळात या परीक्षेमध्ये मोठे बदल करण्यात आले. मागील वर्षापासून ही शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून घेतल्या जाणाºया या परीक्षेसाठी मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी या विषयांसाठी प्रत्येकी १५० गुणांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी विद्यार्थी तसेच शालेयस्तरावर शिक्षक परिश्रम घेत आहेत. मागील वर्षी या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे १५ लाख विद्यार्थी बसले होते, परंतु यावर्षी हा आकडा आठ लाखांच्याही आत आला आहे. शासनातर्फे पाचव्या वर्गाला शिष्यवृत्तीचे ७५० तर आठव्या वर्गाला १००० रुपये वर्षाला देते. कष्ट घेऊन गुणवत्तेमध्ये येणाºया विद्यार्थ्यांना शासन तुटपुंजी शिष्यवृत्ती देणार असेल तर त्याचा काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यातील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये पाचवीच्या १६ हजार तर आठवीच्या १३ हजार विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. पण शिष्यवृत्ती नाममात्र असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांनी या परीक्षेविषयी उदासीनता दाखविली आहे.
संख्या घटल्याने चिंता
सन २०१३-१४ साली इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुमारे ८ लाख ९० हजार विद्यार्थी या परीक्षेस बसले होते तर सातवीच्या परीक्षेस ६ लाख ७९ हजार विद्यार्थी बसले होते. यंदा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेस ४ लाख ४३ हजार विद्यार्थी बसले आहेत तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस ३ लाख ३६ हजार विद्यार्थी बसले आहेत. वरील आकडेवारीवरून परीक्षेस बसणाºया विद्यार्र्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.