नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागात विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:51 PM2018-09-25T22:51:46+5:302018-09-25T22:52:39+5:30

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत बंद करून गळफास लावत आत्महत्या केली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

The student's suicide in Khaparkheda area in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागात विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागात विद्यार्थ्याची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देघरी खोलीत लावला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत बंद करून गळफास लावत आत्महत्या केली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
दर्शन संजय कडू (१४, रा. इसापूर, ता. सावनेर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दर्शन हा दहेगाव (रंगारी) येथील सिक्रेट हार्ट अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. तो सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परत आला होता. त्याने कपडे बदलविले आणि टीव्ही चालू करून खोलीचे दार आतून बंद केले. सायंकाळी त्याचा लहान भाऊ शाळेतून घरी आला. त्याने दार उघडण्यासाठी दर्शनला जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली.
बराच वेळ आवाज देऊनही आतून प्रतिसाद येत नसल्याने त्याने घराच्या मागच्या भागाला असलेल्या दारातून आत प्रवेश केला. तेव्हा त्याला दर्शन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने लगेच आरडाओरड करीत शेजाºयांना व नंतर शेतात गेलेल्या आई, वडील व आजीला बोलावले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्शनने आत्महत्या का केली, हे मात्र कळू शकले नाही. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

‘डिप्र्रेशन’ची शक्यता
दर्शन गेल्या तीन दिवसांपासून शिकवणी वर्गालाही गेला नव्हता. या संदर्भात त्याच्या वर्गातील विद्यार्थिनीने सांगितले की ‘सिव्हिक्स’चा वर्ग सुरू असताना प्राचार्या त्याच्यासोबत अन्य विद्यार्थ्यांवर रागावल्या होत्या. पेपरला (परीक्षा) बसू देणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली होती. या प्रकारामुळे दर्शन ‘डिप्रेशन’मध्ये असावा आणि त्यातूनच त्याने सदर पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: The student's suicide in Khaparkheda area in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.