नायलॉन मांजाने कापला विद्यार्थ्याचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:08 AM2020-12-31T04:08:58+5:302020-12-31T04:08:58+5:30

- आ. अनिल सोले हे महापौर असताना त्यांनी नायलॉन मांजापासून दुचाकीस्वारांचा बचाव होण्यासाठी एक वेगळाच उपाय योजला होता. उड्डाणपुलांवर ...

Student's throat cut with nylon cat | नायलॉन मांजाने कापला विद्यार्थ्याचा गळा

नायलॉन मांजाने कापला विद्यार्थ्याचा गळा

Next

- आ. अनिल सोले हे महापौर असताना त्यांनी नायलॉन मांजापासून दुचाकीस्वारांचा बचाव होण्यासाठी एक वेगळाच उपाय योजला होता. उड्डाणपुलांवर दोन्ही बाजुला असलेल्या विजेच्या खांबांना तार बांधण्यात आली होती. त्यामुळे कटलेला पतंगासोबत जाणारा मांजा थेट पुलावर न येता आधी त्या तारावर रोखला जात होता. कालांतराने चोरट्यांनी काही पुलावर बांधलेली तारही चोरून नेली. महापालिकेने या उपायाकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज आहे.

अशी घ्या काळजी

नायलॉन मांजासंदर्भात कारवाई कधी होईल, हे देवच जाणे. मात्र, नागरिकांनीही वाहन चालविताना स्वत:ची काळजी घेणे अनिवार्य आहे. हेलमेटमुळे बहुतांशी संरक्षण होणारच आहे. त्यामुळे, त्याचा वापर आवश्यक आहे. सोबतच गळ्याभोवती दुपट्टा वापरणे, वाहन हळू चालविणे, रस्त्याच्या मधातून वाहन चालविणे टाळणे कारण बरेचदा मांजा आडवा आला की चालक दांदरतो आणि त्यामुळे वाहनांची धडक होऊ शकते.

मांजाचा वापर होताना दिसताच पोलिसांना कळवा

बरेचदा पोलीस कारवाई करत नाहीत, अशी आरोळी आपण ठोकतो. मात्र, बहुतांश प्रकरणात नागरिकच पोलिसांना सहकार्य करत नाहीत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे, पोलिसांना सहकार्य करण्यासाठी कोणी नायलॉन मांजाचा वापर करत पतंग उडविताना दिसला तर लागलीच पोलिसांना संबंधित टोल फ्री क्रमांकावर कळवा. शिवाय, वस्त्यावस्त्यांमध्ये आपापल्या नगरसेवक, देवस्थान, मोहल्ला समित्यांच्या बैठकीत हा विषय गांभीर्याने ठेवला तर मोठ्या प्रमाणात सजगता वाढेल.

Web Title: Student's throat cut with nylon cat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.