विद्यार्थ्यांनी घेतली लोकसभा सचिवालयाची माहिती, दिल्ली येथे अभ्यास दौरा
By आनंद डेकाटे | Published: April 8, 2024 03:04 PM2024-04-08T15:04:22+5:302024-04-08T15:04:28+5:30
मलिक यांनी विद्यार्थ्यांना संसदेचे कामकाज कशा प्रकारे चालते याबाबत माहिती दिली.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विधी विभागातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक अभ्यास दौरा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकसभा सचिवालय, नवीन संसद भवन, विधानसभा आणि संसद भवन ग्रंथालयाला भेट देत माहिती घेतली.
पदव्युत्तर शैक्षणिक विधी विभागातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या दिल्ली येथील अभ्यास दौऱ्या दरम्यान लोकसभा सचिवालयाचे संचालक पी.के. मलिक यांच्याशी संवाद साधला. मलिक यांनी विद्यार्थ्यांना संसदेचे कामकाज कशा प्रकारे चालते याबाबत माहिती दिली. आगमनानंतर विद्यार्थ्यांना सोबतच लोकसभा सचिवालय, भारतीय संसदेचा इतिहास, वास्तुकला आणि महत्त्व याविषयी सर्वसमावेशक विस्तृत माहिती मलिक यांनी दिली.
विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरे मुंदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्राध्यापक पद्मा चौबे, दिपाली मानकर, रिचा कोचर आणि शिवानी खंडाते यांच्या सह एलएलएमच्या ३० विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. लोकशाही आणि शासनाच्या तत्त्वांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती झाली आणि कायदेशीर तसेच राजकीय प्रणालींबद्दल त्यांचा दृष्टीकोन विस्तृत झाला.