नागपुरात अवैध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:28 AM2018-04-11T00:28:18+5:302018-04-11T00:28:29+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम आहेत, असे असतानाही अवैध वाहनांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. वाहतूक शाखा नागपूर ग्रामीणने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला घेऊन गेल्या सहा दिवसात तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात २३२ वाहने दोषी आढळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम आहेत, असे असतानाही अवैध वाहनांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. वाहतूक शाखा नागपूर ग्रामीणने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला घेऊन गेल्या सहा दिवसात तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात २३२ वाहने दोषी आढळली. त्यांच्यावर कारवाई करून १ लाख २१ हजार १०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
वाहतूक शाखा ग्रामीणच्यावतीने ३ ते ९ एप्रिल दरम्यान स्कूल बस, स्कूल व्हॅनसह विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी खापरख्ोडा, काटोल, कोंढाळी, मौदा, कन्हान, बोरी, एमआयडीसी बोरी, रामटेक, सावनेर, केळवद, कळमेश्वरच्या हद्दीत करण्यात आली. मोटार वाहन कायद्यानुसार जे वाहन विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करीत होते, स्कूल व्हॅन व बस चालविताना धुम्रपान करीत होते, युनिफॉर्मचा वापर न करता व बॅच न लावता वाहन चालवित होते, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविण्यात आले होते, सीटबेल्टचा वापर नव्हता, वाहन चालविताना मोबाईलचा वापर केला जात होता, ज्या स्कूल बसमध्ये अटेन्डंट नव्हते, वाहनाचे पी.यु.सी, फिटनेस प्रमाणपत्र नव्हते, वाहनाचे मुळ कागदपत्र नव्हते अशा एकूण २३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख २१ हजार १०० रुपयांचे तडजोड शुल्कही आकारण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीणचे शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीणचा मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए.बी. शेख, पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताळाकोटे, सतीश सोनटक्के व सहकाºयांनी केली.