विद्यार्थ्यांनी समजून घेतले ‘लॅण्डस्केप’चे बारकावे
By admin | Published: February 25, 2017 02:08 AM2017-02-25T02:08:01+5:302017-02-25T02:08:01+5:30
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित दोन दिवसीय वॉटर कलर लॅण्डस्केप कार्यशाळेचे शुक्रवारी उद्घाटन झाले.
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत कार्यशाळा
नागपूर : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित दोन दिवसीय वॉटर कलर लॅण्डस्केप कार्यशाळेचे शुक्रवारी उद्घाटन झाले. या कार्यशाळेत सहभागी १५ विद्यार्थी-कलावंतांनी पहिल्या दिवशी तज्ज्ञांकडून लॅण्डस्केप पेंटिंगचे बारकावे शिकून घेतले. मुंबई येथून आलेले अमोल पवार यांनी या विद्यार्थ्यांना वॉटर कलर बेसिक स्टडी, चित्रांची मांडणी, स्पॉट सिलेक्शनची पद्धत याबाबत सविस्तर माहिती दिली. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ चित्रकार बिजय बिस्वाल यांनीही या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थी उद्या शनिवारी अजनी रेल्वे स्टेशन येथे लाईव्ह प्रात्यक्षिक करणार आहेत. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रफुल तायवाडे, विजय अनसिंगकर व जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे सहकार्य लाभत आहे.(प्रतिनिधी)