विद्यार्थ्यांना पुन्हा ५० दिवसाच्या पोषण आहाराचे वाटप होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:25+5:302021-01-15T04:08:25+5:30
यंदा शासनाने या धान्य वितरणातील मेनूमध्ये थोडा बदल केला आहे. त्यानुसार तांदळासोबतच मसूर डाळ व हरभऱ्याचेही वितरण होणार आहे. ...
यंदा शासनाने या धान्य वितरणातील मेनूमध्ये थोडा बदल केला आहे. त्यानुसार तांदळासोबतच मसूर डाळ व हरभऱ्याचेही वितरण होणार आहे. शालेय पोषण आहार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातो. काही शाळांमध्ये खिचडीच्या स्वरूपात मध्यान्ह भोजन शिजविल्या जाते. तर शहरातील काही शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुरविण्याचे कंत्राट काही सामाजिक संस्था व बचत गटांना दिले आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद झाल्या. अजूनही १ ते ८ वर्गापर्यंतच्या शाळा सुरू झाल्या नाही. त्यामुळे पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याऐवजी धान्याचेच वितरण करण्यात येत आहे. शासनाने विद्यार्थ्यांना डिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीतील ५० दिवसाचे धान्य वितरित करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासाठी शिक्षण संचालक प्राथमिक यांनी जि.प.च्या शालेय पोषण आहाराकडे मागणी नोंदविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोषण आहार विभागाने संचालकांकडे मागणी नोंदविली आहे. वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांना ५ किलो तांदूळ , मसूर डाळ ९०० ग्रॅम व हरभरा १ किलो ९०० ग्रॅम तर इयत्ता ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांना साडेसात किलो तांदूळ, मसूर डाळ १ किलो ३०० ग्रॅम व हरभरा २ किलो ९०० ग्रॅम स्वरूपात वितरित करण्यात येईल.