विद्यार्थ्यांना आपली शाळाच मिळणार सेंटर; बोर्ड लवकरच करणार घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 07:10 AM2022-02-03T07:10:00+5:302022-02-03T07:10:03+5:30

Nagpur News ऑफलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरून विरोध करीत असल्याने राज्य शिक्षण मंडळ दबावात आहे. त्याच कारणाने बोर्डाने यंदा विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Students will get their own school center; The board will make an announcement soon | विद्यार्थ्यांना आपली शाळाच मिळणार सेंटर; बोर्ड लवकरच करणार घोषणा

विद्यार्थ्यांना आपली शाळाच मिळणार सेंटर; बोर्ड लवकरच करणार घोषणा

Next

आशिष दुबे

नागपूर : ऑफलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरून विरोध करीत असल्याने राज्य शिक्षण मंडळ दबावात आहे. त्याच कारणाने बोर्डाने यंदा विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा व्हायची आहे.

ज्या शाळांची विद्यार्थीसंख्या १५ ते २० आहे. त्यांची व्यवस्था जवळच्या शाळेत करण्यात येणार आहे. परीक्षेची जबाबदारी प्राचार्यांची असणार आहे. पण, परीक्षा निरीक्षक म्हणून बाहेरून शिक्षक येणार आहे. परीक्षेच्या काळात कुठलीही गडबड होणार नाही, यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच बोर्ड आदेश देणार आहे. या मागचे कारण बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारल्यावर ते म्हणाले की कोरोनाची स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात तयारी सुरू आहे, तयारी पूर्ण झाल्यावर आदेश काढण्यात येईल.

- अधिकाऱ्यांवर कामाचा भार वाढणार

बोर्डाच्या या निर्णयामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा भार वाढणार आहे. परीक्षेपूर्वी त्यांना शाळेत जाऊन निरीक्षण करावे लागणार आहे. शाळेत सोयीसुविधा तसेच प्रश्न व उत्तरपत्रिकेच्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

 

Web Title: Students will get their own school center; The board will make an announcement soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ssc examदहावी