विद्यार्थ्यांचा नशिबी ‘योग’ आलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:10 AM2018-06-22T01:10:43+5:302018-06-22T01:11:02+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. बुधवारी जगभरात साजऱ्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली आहे. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण्याच्या अक्षताच दाखविल्या. बऱ्यांच महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा करणे तर सोडाच विद्यार्थ्यांना माहिती देण्याची तसदीदेखील घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा महाविद्यालयांवर फारसा वचक नसल्याची अनेकदा ओरड होते. बुधवारी जगभरात साजऱ्या करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने ही बाब परत एकदा समोर आली आहे. नागपूर विद्यापीठाने पाठविलेल्या निर्देशांना अनेक महाविद्यालयांनी चक्क वाटाण्याच्या अक्षताच दाखविल्या. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा करणे तर सोडाच विद्यार्थ्यांना माहिती देण्याची तसदीदेखील घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव संमत केला होता. त्यानुसार अगदी वॉशिंग्टनपासून जगभरात विविध ठिकाणी योग दिवस साजरा करण्यात आला. नागपूर विद्यापीठातदेखील योग दिवस साजरा करण्यात यावा, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन तसेच राजभवनातर्फे देण्यात आले होते. विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ४ जून रोजी पत्र लिहून याची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली होती. यानिमित्ताने योगाबद्दल प्रचार-प्रसार करणाºया ‘फिल्मस्’ दाखविणे तसेच प्रचारसाहित्याचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले होते.
काही मोजक्या महाविद्यालयांनी योग दिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले. मात्र बहुतांश महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्षच केले. शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी अद्याप वर्गांमध्ये हवी तशी गर्दी दिसून येत नसल्याचे चित्र आहे. अनेक महाविद्यालयांनी हा उपक्रम राबविण्याची तसदीच घेतली नाही. बºयाच ठिकाणी तर सूचनाफलकावर साधी सूचना लावण्याचीदेखील तसदी घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाचीदेखील ‘लेटलतिफी’
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासंदर्भात १९ मे रोजी निवासी उपजिल्हाधिकाºयांनी राज्य शासनाच्या निर्देशाबाबत कळविले होते. त्याचे पत्रदेखील पाठविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठातर्फे ४ जून रोजी प्राचार्यांना पत्र पाठविण्यात आले व संकेतस्थळावर ही नोटीस १९ जून रोजी ‘अपलोड’ करण्यात आली. त्यामुळे महाविद्यालयांतदेखील हवी तशी वातावरणनिर्मिती होऊ शकली नाही.