बौद्धिक संपदेच्या रक्षणासाठी अभ्यासवर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:27 AM2017-11-09T01:27:05+5:302017-11-09T01:35:06+5:30

संयुक्त राष्ट्रांतर्गत कार्यरत जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्लूआयपीओ अकादमी), केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था....

Study classes for the protection of intellectual property | बौद्धिक संपदेच्या रक्षणासाठी अभ्यासवर्ग 

बौद्धिक संपदेच्या रक्षणासाठी अभ्यासवर्ग 

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते उद््घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संयुक्त राष्ट्रांतर्गत कार्यरत जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्लूआयपीओ अकादमी), केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सिव्हिल लाईन्सस्थित आरजीएनआयआयपीएम येथे ६ ते १७ नोव्हेंबरदरम्यान बौद्धिक संपदेविषयी ग्रीष्मकालीन अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. 
पेटंटस्, डिझाईन व ट्रेडमार्कचे महानियंत्रक एस.ओ.पी. गुप्ता, डब्ल्यूआयपीओ अकादमीच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे संस्थाप्रमुख जोसेफ एम. ब्रॅडली, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार आणि पेटंट व डिझाईन्सचे संयुक्त नियंत्रक डॉ. के.एस. कर्डाम  याप्रसंगी उपस्थित होते. बांगलादेश, कोरिया, भारत, दक्षिण आफ्रिका, दुबई यासह अनेक देशांतील सुमारे ४८ प्रतिनिधी या अभ्यासवर्गात सहभागी झाले आहेत. या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांना बौद्धिक संपदा (आय.पी.)क्षेत्रातील सविस्तर ज्ञान घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
 यावेळी अनुप कुमार यांनी बौद्धिक संपत्तीचे विशेषत: भौगोलिक संकेतांक यांचे संरक्षण, बौद्धिक संपदा हक्कांची सुलभ नोंदणी-प्रक्रिया व त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी यावर भर दिला.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरचे प्रा.डॉ. नरेश कुमार वत्स यांनी आभार मानले केले. आरजीएनआयआयपीएम नागपूरचे प्रमुख व सहायक नियंत्रक पेटंटस् आणि डिझाईन्स पंकज बोरकर,
आरजीएनआयआयपीएमच्या वरिष्ठ दस्तऐवज अधिकारी (सिनियर डॉक्युमेन्टेशन आॅफिसर) सी.डी. सातपुते, वरिष्ठ संयुक्त नियंत्रक पेटंटस् आणि डिझाईन्स, पेटंट आॅफिस नवी दिल्लीचे डॉ. के.एस. कदम,  सुखदीप सिंग, डॉ. मनीष यादव, डॉ. रागिणी खुबाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

Web Title: Study classes for the protection of intellectual property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.